Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : ‘लम्पी’मुळे मृत जनावरांच्या मालकांना मदतीची अपेक्षा

Farmer Lumpy Compensation : लम्पी आजारामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर जनावरे दगावल्याने आर्थिक संकट ओढवले आहे.

Team Agrowon

Solapur News : लम्पी आजारामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर जनावरे दगावल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता. ९) ५७ गोवर्गीय जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मृत जनावरांच्या मालकांकडून केली जात आहे.

यंदा जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाळ्याला सुरवात झाली. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली; मात्र लवकर झालेल्या पावसाने वाढलेली दलदल व माशा, डासांमुळे जिल्ह्यात लम्पीची साथ पसरली.

आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार ९६५ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, त्यापैकी एक हजार ४६७ जनावरे बरी झाली आहेत. मात्र, ५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दूध, शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकरी पशुपालकांची जनावरे आजारी पडून दगावत आहेत.

२०२२ मध्ये मदतीमुळे दिलासा

वर्ष २०२२ मध्येही राज्यात लम्पीची साथ पसरली होती. तेव्हा मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली होती. ती संख्या एकेका जिल्ह्यात शेकड्याने होती. सरकारने लम्पीमुळे मृत्यू झालेल्या दुधाळ गायीला ३० हजार, बैलासाठी २५ हजार तर वासराला १६ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती

लम्पीमुळे बाधित जनावरांच्या मालकांना मदत देण्याबाबत अद्याप निर्देश नाहीत. मृत गोवर्गीय जनावरांची आकडेवारी वरिष्ठांना कळवली जात आहे. जिल्ह्यात ५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. उपलब्ध लसींचा पुरवठा झाला असून लसीकरणाला सुरवात झाली आहे. मात्र, त्यानंतरही आठ दिवस पशुधनाची काळजी घ्यावी लागते. सद्य:स्थिती पाहता पशुधनाचे मृत्यूचे प्रमाण निश्‍चितच कमी होईल.ा
- डॉ. विशाल येवले, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, सोलापूर
खिलार गोवंशात लम्पीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक आहे. पशुपालक शेतकरी संकरित गायींचा विमा उतरवतात; मात्र देशी गोवंशाचा विमा उतरवत नाहीत. सरकारही गोरक्षणाबाबत गंभीर आहे. तर लम्पीमुळे मृत जनावरांची संख्या कमी वाटते. मात्र, अनेक तक्रारी पशुसंवर्धन विभागाकडे केल्या गेल्या नसल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मृत पशुधनाच्या पालकांना सरकारने मदत केल्यास त्यांना दिलासा मिळेल.
- विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Disease : ऊस पिकावर तांबेरा, करपा रोग

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

Crop Insurance Scheme Reforms : जुन्या पीकविमा योजनेतील त्रुटी नव्या योजनेतही कायम

Agriculture Research : कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे देशातील १४२ कोटी लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य

Agriculture Scheme: शेततळ्यासाठी २ लाखांपर्यंत मिळणार अनुदान; शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना

SCROLL FOR NEXT