Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Vaccination : तेवीस हजार ५०४ जनावरांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसीकरण

जिल्ह्यातील गायवर्गीय १ लाख ५ हजार ८ जनावरांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात अजूनही लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झालेले एकही जनावरे नाही.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी : लम्पी स्कीनच्या (Lumpy Skin Disease)अनुषंगाने खबरदारी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन (Livestock) विभागाने जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात केली असून आतापर्यंत २३ हजार ५०४ जनावरांना लसीकरण (Vaccination)पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गायवर्गीय १ लाख ५ हजार ८ जनावरांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यात अजूनही लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झालेले एकही जनावरे नाही. तरीदेखील खबरदारीचे सर्व उपाय पशुसंवर्धन विभागाकडून सुरू आहेत. सुरुवातीला जिल्ह्याकरिता १० हजार लसी उपलब्ध झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा २५ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत.

जिल्हा पशुसंवर्धन विभागाची दहा ते पंधरा पथके लसीकरण करण्यात गुंतली आहेत. आतापर्यंत २३ हजार ५०४ जनावरांना लसीकरण पूर्ण झाले आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडे १२ हजार लसी उपलब्ध असून पुढील चार दिवसांत आणखी ५० हजार लसी उपलब्ध होणार आहेत.

जिल्ह्यातील एकूण १ लाख ५ हजार ८ गायवर्गीय जनावरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाने ठेवले आहे. सध्या ज्या एकाच ठिकाणी जनावरांची संख्या जास्त आहे, तेथेच लसीकरण केले जात आहे.

जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसींतून २३ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. येत्या चार-पाच दिवसांत जिल्ह्याला आणखी ५० हजार लसी उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांनी लसीकरणासाठी सहकार्य करावे.

- डॉ. विद्यानंद देसाई, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सिंधुदुर्ग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Prices: सोयाबीन ठरणार ‘गोल्डन बीन’

India Rice Export: ‘यूएसडीए’ने घटवला भारतीय तांदूळ निर्यातीचा अंदाज

Global Economy: जागतिक विकासदर घटण्याचा अंदाज

Delhi Protest Restrictions: पोलिस दिल्लीचे आणि मुंबईचे...

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

SCROLL FOR NEXT