Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : आठ गावांत आढळले ‘लम्पी स्किन’जनावरे

राज्यभरात थैमान घालणाऱ्या ‘लम्पी स्किन’ आजाराची जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ गावांतील जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : राज्यभरात थैमान घालणाऱ्या ‘लम्पी स्किन’ आजाराची (Lumpy Skin Disease) जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ गावांतील जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे (Lumpy Skin Symptoms) आढळून आली आहे. दरम्यान, या रोगाचा प्रार्दुभाव वेगाने पसरू नये यासाठी पशू पालकाने सतर्क राहण्याचे, आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी (ता. १२) पत्रकार परिषदेतून केली आहे.

माणसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच आता काही ठिकाणी जनावरांना देखील ‘लंपी स्किन’ या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता माणसांप्रमाणे जनावरांना देखील क्वॉरंटाईन करण्याची वेळ आली आहे. ‘लम्पी स्किन’ हा आजार प्रामुख्याने गोवंशिय जनावरांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रीपोक्स प्रवर्गातील विषाणूंमुळे हा आजार बळावतो.

देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरे या आजारांना लवकर बळी पडतात. दमट वातावरणामुळे कीटकांची मोठी वाढते. देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरे लवकर बळी पडतात. दमट वातावरणामुळे कीटकांची मोठी वाढ होते. विशेषतः चवणाऱ्या माशा, डास, गोचिड, वेगवेगळे कीटक त्यांच्यामुळे या रोगाचा संसर्ग एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांपर्यंत पोहोचतो आहे. औरंगाबादेतील ५ तालुक्यातील ८ गावांमध्ये बाधित जनावरे आढळले आहे. यात बाधित पशूंची संख्या ३२ असून औषधोपचाराने २९ जनावरे बरे झाले आहे.

जिल्ह्यातील एकूण पशुधनाची संख्या ६ लाख २६ हजार ८८८ इतकी आहे. यात गायवर्गीय पशुधन ५ लाख ३४ हजार ३९४ तर म्हैस वर्ग पशूंची संख्या ९२ हजार ४९४ इतकी आहे. आतापर्यंत ५ हजार ५२५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रादुर्भाव झालेल्या गावांपासून ५ किलोमीटरच्या परिघात प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात जनावरांचे बाजार भरविण्यास बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

या गावांत आढळलेले ‘लम्पी स्किन’ जनावरे

जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात तिसगांव, सिल्लोड तालुक्यात बाळापूर, सोयगाव तालुक्यात फर्दापुर, पैठण तालुक्यात शेकटा, ढाकेफळ, ढोरकिन, कौडगांव, गंगापूर तालुक्यात गंगापूर या ठिकाणी प्रादुर्भाव आढळून आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: 'तृणमूल काँग्रेस'चं नाव, चिन्ह गोठवलं; ममतांच्या पक्षाला ‘फुटबॉलपटू’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी ३,८३६ मतदार

Farmers Protest : पीक पंचनामा मुद्द्यावर सटाण्यात तहसीलदारांना घेराव

Mohapada Encroachment : मोहपाडा अतिक्रमणप्रश्नी उपग्रह प्रतिमांचा आधार

Dried Sugarcane Crops : करपलेल्या उसात जनावरे सोडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT