Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : साताऱ्यात लसीकरणामुळे ‘लम्पी स्कीन’वर नियंत्रण

Lumpy Skin Disease : अजूनही या लम्पी स्कीनचे एकही जनावर बाधित झालेले नसल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त विनोद पवार यांनी दिली आहे.

Team Agrowon

Satara News : लसीकरणामुळे राज्यभर थैमान घातलेला ‘लम्पी स्कीन’ जिल्ह्यात नियंत्रणात आला आहे. अजूनही या लम्पी स्कीनचे एकही जनावर बाधित झालेले नसल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त विनोद पवार यांनी दिली आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी जुलै-ऑगस्टदरम्यान अनेक गावागावांत जनावरे लम्पी स्कीन या आजाराने बाधित झाली होती.

या आजाराने अनेक जनावरांचा मृत्यू झाला होता. या रोग नियंत्रणासाठी शासनाने लम्पी स्कीनसाठी लसीकरणाची मोहीम गावोगावी राबविल्याने साथीवर नियंत्रण आले. पाऊस सुरू झाल्याननंतर राज्यात काही ठिकाणी लम्पीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला असला, तरी अद्याप जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव कुठेही झालेला नसल्याची माहिती श्री. पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात तीन लाख ५२ हजारांवर ४३६ जनावरे असून, तीन लाख ५२ हजार लसी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यापैकी एक लाख ७६ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

लसीकरणाची मोहीम सर्वत्र सुरू असून, मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा केला जात आहे. रोगाविषयी जनजागृत्ती व लसीकरणाचे कामे सध्या वेगात सुरू आहे.

लम्पी स्कीन आजार नियंत्रणासाठी शासनाने लसीकरणाची मोहीम गावोगावी राबविल्याने साथीवर नियंत्रण आले. अद्याप जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव कुठेही झालेला नाही.
- विनोद पवार, पशुसंवर्धन उपायुक्त, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT