Livestock Farming  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Husbandry : पशुपालनाने ग्रामीण भागात आर्थिक क्रांती

Livestock Farming : देशाच्या कृषी विकासात पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाचे मोठे योगदान आहे.

Team Agrowon

Nagpur News : देशाच्या कृषी विकासात पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाचे मोठे योगदान आहे. दूध, मांस आणि अंडी उत्पादनातही देशाची आगेकूच सुरु असून आर्थिक संपन्नतेसाठी शेतकऱ्यांना हा चांगला पर्याय ठरत असल्याचे प्रतिपादन सावनेर येथील सरस्वती महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या नीता इंगोले यांनी केले.

विशेष घटक योजना २०२३-२४ अंतर्गंत पंचायत समिती सावनेर मध्ये तीन दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षणाला सुरवात झाली. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्‍त डॉ. शशिकांत मांडेकर, तर पाहुण्या म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी जातगडे यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक पंचायत समिती सावनेरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकिंदा जोगेकर यांनी केले. डॉ. मांडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतमालाची उत्पादकता निघण्यास ठरावीक कालावधी लागतो. मात्र पशुपालनातून रोज ठरावीक रक्‍कम मिळते.

त्याचा विनियोग दैनंदिन खर्चावर केल्यास आर्थिक चणचण भासत नाही. त्यामुळेच शेतीपूरक नाही तर आजच्या काळात अनेकांनी त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणूनच पशुपालनाला पसंती दिल्याचे आपल्या भाषणात सांगितले. संचालन वैशाली वाहाणे यांनी केले. प्रशिक्षण वर्गाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कविता मोरे, पशुधन विकास अधिकारी सुजाता ताथोड यांनी भेट दिली.

यावेळी बोलताना त्यांनी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शास्त्रोक्‍त दुग्धव्यवसाय, पशू व मत्स्यपालनाच्या टिप्स यावेळी पशुपालकांना देण्यात आल्या. प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी डॉ. सुधाकर कोहळे (मानेगाव) यांच्या डेअरी फार्मला भेट देण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात गट विकास अधिकारी मनोज हिरुडकर, नांदागोमूख सरपंच ज्योती मोवाडे, डॉ. जोगेकर, डॉ. कोहाड यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Expressway: शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही- राजू शेट्टी

Superintendent Agriculture Officer: लातूरच्या ‘एसएओ’पदी राजेंद्र कदम यांची नियुक्ती

Road Project: मोहोळ-तांदूळवाडी मार्ग मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

Political Controversy: गाळे बांधकामाबाबतीत आरोप राजकीय हेतूने प्रेरित

Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे

SCROLL FOR NEXT