Sangli News : राज्यात पशुगणनेला गती आली आहे. ५१ हजार ७६८ गावे, प्रभागांपैकी ४० हजार १७८ गावांत, प्रभागात पशुगणना पूर्ण झाली आहे. पशुगणना उशिरा सुरू झाल्यामुळे एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे राज्यात पशुगणना ७७.६१ टक्के पूर्ण झाली असून मार्चअखेर पूर्ण होईल, असा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.
राज्यात पशुगणना नोव्हेंबरपासून सुरू झाली. मुळात महाराष्ट्र वगळता इतर राज्यात २५ ऑक्टोबरपासून पशुगनणा सुरू झाली. त्यामुळे राज्यात एक महिना पशुगणलेला विलंब झाला होता. राज्यातील ४४ हजार ४७० गावे आणि ७ हजार ९२२ प्रभाग असे एकूण ५१ हजार ७६८ ठिकाणी एकविसावी पशुगणना झाली. पशुगणना करण्यासाठी ७ हजार ७४९ प्रगणक आणि १ हजार ४२४ पर्यवेक्षक यांच्याकडून काम सुरू आहे.
वास्तविक पाहता पशुगणनेसाठी गावांची आणि प्रभागाच्या संख्येच्या तुलनेत प्रगणकांची संख्या तोकडी असल्याने जानेवारीच्या मध्यापर्यंत पशुगणेची टक्केवारी ४४ पर्यंतच पोहोचली होती. दरम्यानच्या काळात फेब्रुवारीअखेर ही गणना पूर्ण होणार असल्याने एक महिन्याची मुदतवाढ दिली. अर्थात, ही मुदत मार्चअखेर असणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यादरम्यान, प्रगणकांनी लहान गावांतील पशुगणना पूर्ण केली असून आता मोठ्या गावातील गणनेचे काम सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक पशुगणनेचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई विभागात ६६ टक्के पशुगणना उरकली आहे. सद्यःस्थितीला ७३० गावे आणि प्रभागात पशुगणनेचे काम संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. तर ११ हजार ६० गावे आणि प्रभागातील पशुगणनेच्या प्रक्रियेचे काम युद्ध पातळीवर आहे.
पूर्ण झालेली पशुगणना आणि प्रक्रिया सुरू असलेली प्रक्रियेची टक्केवारी ९८ इतकी झाली आहे. मार्चअखेर पशुगणना पूर्ण करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. मात्र प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची संख्या तोडकी असल्याने या महिनाअखेर ही गणना पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांत कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तर अतिवृष्टीमुळे चाराटंचाईही भासली होती. त्यामुळे अनेक पशुपालकांनी जनावरांची विक्री केली आहे. तर बहुतांश भागात पशुपालकांची संख्याही कमी केली आहे.
त्यामुळे या पशुगणनेत अनेक भागात पशूंची संख्या कमी झाली आहे, तर काही ठिकाणी पशूंची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपूर्वीपेक्षा या पशुगणनेतून जनावरांची संख्या कितीने वाढली अथवा कितीने घटली हे या गणनेनंतर स्पष्ट होईल.
विभागनिहाय पशुगणना दृष्टिक्षेपात
विभाग... गावे, प्रभाग संख्या... पूर्ण गावे, प्रभाग संख्या...टक्केवारी
मुंबई...७४१३...४९२५...६६.४४
नाशिक...७८९५...५५३२...७०.०७
पुणे...८०५९...५३८०...६६.७६
छत्रपती संभाजीनगर...५२७९...४९४५...९३.६७
लातूर...४६८६...४४४९...९४.९४
अमरावती...८३८६....६६४१...७९.१९
नागपूर...१००५०...८३०६...८२.६५
एकूण...५१७६८...४०१७८...७७.६१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.