green manuring crops
green manuring crops Agrowon
काळजी पशुधनाची

Kharip Crop : खरीपासाठी हिरवळीची पिके कोणती?

Roshani Gole

जमिनीमध्ये हिरव्या वनस्पती (green manure crops) किंवा त्यांची पाने, कोवळ्या फांद्या चिखलणीच्या वेळी पुरले जाते, यालाच आपण हिरवळीचे खत म्हणतो. यामध्ये हिरवळीचे खत म्हणून विविध वनस्पतींचा वापर केला जातो. जमिनीमध्ये हिरवळीचे पीक पुरण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये पिक त्याच जमिनीत उगवून, तेथेच गाडले जाते. यामध्ये ताग, धैंचा (dhaincha), उडीद, मूग, चवळी या पिकांचा समावेश होतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये हिरवळीच्या झाडांची पाने, फांद्या बाहेरून आणून जमिनीत गाडली जातात. यामध्ये गिरिपुष्प (Glyricidia), करंज, शेवरी, सुबाभूळ या झाडांचा समावेश होतो.

हिरवळीच्या खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीतील सुक्ष्म जीवाणूंची वाढ चांगली होते. जमिनीतील स्फुरद, पालाश, लोह या मुलद्र्व्याची उपलब्धता वाढीस लागते.

खरीप हंगामात हिरवळीचे खत म्हणून ताग, धैंचा, मूग, चवळी, गवार, बरसीम, कुळीथ यांसारख्या पिकांची लागवड करावी. यामध्ये तागापासून सर्वात जास्त हिरवळीचे खत मिळते. त्यामागोमाग धैंचा आणि गवारीपासून उत्पादन मिळते. तागापासून प्रति हेक्टरी १५२ क्विंटल हिरवळीचे खत मिळते. धैंचा आणि गवारीपासून प्रति हेक्टरी १४४ क्विंटल हिरवळीच्या खताचे उत्पादन होते.

ताग हे उत्तम हिरवळीचे खत आहे. पुरसा पाऊस असलेल्या भागात तागाचे पिक घ्यावे. तागापेक्षा काटक असे हिरवळीचे पीक म्हणून धैंचाची ओळख आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाचे हिरवळीचे पिक म्हणजे गिरिपुष्प होय. गिरीपुष्पाची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगली होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : पाताळगंगा नदीत दूषित पाणी

Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

SCROLL FOR NEXT