Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सातारा जिल्ह्यात १३ जनावरांचा मृत्यू

एकाच दिवसात १३ जनावरांचा लम्पी स्कीन आजाराने मृत्यू झाला असून, ८९ बाधित गावांमधील एक हजार १४६ जनावरांना प्रादुर्भाव झाला आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा : जिल्ह्यात लम्पी स्कीनमुळे (Lumpy Skin DIsease) सोमवारी (ता. २६) एकाच दिवसात १३ जनावरांचा लम्पी स्कीन आजाराने मृत्यू झाला असून, ८९ बाधित गावांमधील एक हजार १४६ जनावरांना प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या आजाराने आतापर्यंत ७५ जनावरांचा मृत्यू झाला असून, १५४ जनावरे नियमित उपचाराने (Animal Care) बरी झाली आहेत.

सद्यःस्थितीत ९१७ जनावरांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ४७ हजार ५५३ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर बाधित क्षेत्रात एक लाख ५७ हजार ९८, तर अन्य क्षेत्रात ११ हजार २४६ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर सद्यःस्थितीत जिल्ह्यात दोन लाख ८१ हजार लसींचे डोस शिल्लक आहेत. लम्पी स्कीन आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव फलटण तालुक्यात झाला असून

त्या तालुक्यासह इतर तालुक्यांत खासगी संस्थामार्फतही औषधांचे वाटप करण्यात येत आहे. लम्पी स्कीनचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या फलटण तालुक्यासह इतर काही गावांमध्ये खासगी डॉक्टरांच्या बैठका घेऊन उपचारासंदर्भात सूचनाही देण्यात येत आहेत. याचबरोबर जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराच्या जनजागृतीसह विविध प्रकारच्या ४० हजार भित्तिपत्रकांद्वारे गावागावी वाटप करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरात जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी पशुवैद्यकीय सेवादात्यांमार्फत लम्पी स्कीन रोगाचे लसीकरण सुरू आहे, तसेच लम्पी स्कीनच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका पशुचिकित्सालयात उपलब्ध आहेत.

-डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT