Animal Diet Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Diet : जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाची जीवनसत्त्वे

जीवनसत्त्वे शारीरिक क्रियांचे नियमन, रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करू निरोगी शरीर राखण्यास मदत करतात. आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरामध्ये विविध समस्या आढळून येतात. त्यासाठी संतुलित आहारामधून उपयुक्त जीवनसत्त्वांचा योग्य प्रमाणात पुरवठा होईल याची काळजी घ्यावी.

Team Agrowon

डॉ. आर. बी. अंबादे, डॉ. एस. एच. दळवी, डॉ. पी. व्ही. मेश्राम

Animal Diet Management जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी (Animal Health) १३ प्रकारची जीवनसत्त्वे (Vitamins In Animal Diet) महत्त्वाची आहेत. त्यात जीवनसत्त्व अ, क, ड, ई आणि ब जीवनसत्त्वे (थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन, पॅन्टोथेनिक ॲसिड, बायोटिन, बी-६, बी-१२ आणि फोलेट) इत्यादींचा समावेश होतो.

शरीराला योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करण्यासाठी ही सर्व जीवनसत्त्वे वेगवेगळे कार्य करतात. त्यामुळे आहारातून योग्य प्रमाणात त्यांचा पुरवठा होणे आवश्यक आहे.

स्निग्धात विरघळणारी जीवनसत्त्वे

जीवनसत्त्व अ ः

डोळ्यांचे आरोग्य, हाडांची वाढ, प्रतिकारशक्ती आणि एपिथेलियल पेशींच्या देखभालीसाठी आवश्यक असते.

डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी हे जीवनसत्त्व महत्त्वाचे आहे.

कमतरतेची लक्षणे ः

रातांधळेपणा दिसतो.

जास्त प्रमाणात कमतरता असल्यास डोळे कोरडे होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते.

जीवनसत्त्व ड ः

शरीरातील कॅल्शिअम आणि फॉस्फेटचे प्रमाण नियंत्रित राखण्यास मदत करते.

हाडे, दात आणि स्नायू निरोगी ठेवण्यासाठी या जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.

कमतरतेची लक्षणे ः

हाडांमध्ये विकृती येण्याची समस्या दिसून येते.

लहान वासरांमध्ये मुडदूस आणि प्रौढ जनावरांमध्ये ऑस्टियोमॅलेशियामुळे हाडांचे दुखणे उद्‍भवते.

जीवनसत्त्व इ ः

शरीरातील स्नायू, रक्ताभिसरण, पुनरुत्पादन प्रणालींमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करते.

रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यास मदत करते.

लाल रक्तपेशींची निर्मिती आणि रक्तवाहिन्यांची मजबुती करण्यास मदत. रक्त गोठू नये यासाठी उपयुक्त.

जीवनसत्त्व ‘क’चा उपयोग करून घेण्यास मदत.

कमतरतेची लक्षणे ः

मज्जातंतू आणि स्नायूंमध्ये समस्या निर्माण होतात.

पायांमध्ये जाणीव होण्याची शक्ती कमी होते.

शरीराच्या हालचालींवरील नियंत्रण कमी होते. स्नायू कमकुवत होतात.

प्रजनन व वंध्यत्वासंबंधी समस्या येतात.

जीवनसत्त्व के ः

जखम झाल्यानंतर रक्त गोठविण्यासाठी मदत करते.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

कमतरतेची लक्षणे ः

जखम झाल्यास रक्तस्राव जास्त होणे किंवा रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.

पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे

साधारणपणे ११ जीवनसत्त्वांचा समावेश होतो. प्रामुख्याने थायमिन (विटा B१), रिबोफ्लाविन (विटा B२), नियासिन (विटा B३), अडेनीन (विटा B४), पँटोथिनिक ॲसिड (विटा B५), पायरीडॉक्सिन (विटा B६), बियोटीन (विटा B७), इनॉसिटॉल (विटा B८), फोलेट (विटा B९), पॅरामिनोबन्झॉइक ॲसिड (विटा B१०), कोबालामीन (B१२) यांचा समावेश होतो.

थायमीन (जीवनसत्त्व बी १) ः

जनावरांच्या शरीरातील कर्बोदकांच्या चयापचयासाठी आवश्यक.

मेंदू आणि मज्जातंतूचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी उपयुक्त.

कमतरतेची लक्षणे ः

थकवा येणे, भूक न लागणे, ओटीपोटात अस्वस्थता आणि वजन कमी होते.

तीव्र कमतरतेमध्ये मेंदू, मज्जातंतू, हृदयामध्ये समस्या.

मेंदूला ऊर्जेचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. मेंदूच्या कार्यात अडथळा आल्याने फिट येते.

रिबोफ्लाविन (जीवनसत्त्व बी२) ः

लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत.

कोठीपोटातील जिवाणू हे जीवनसत्त्व नैसर्गिकरीत्या तयार करतात. अशक्त जनावरांमध्ये हे कार्य सुरळीत पार पडण्यास अडचणी येतात.

कमतरतेची लक्षणे ः

थकवा, शारीरिक वाढ मंदावते, पचनासंबंधीच्या समस्या दिसून येतात.

पायांच्या कोपऱ्याभोवती भेगा पडणे, फोड, सूज येणे, घसा खवखवणे अशा समस्या.ॲनिमिया होतो.

नियासिन (जीवनसत्त्व बी३) ः

शरीराद्वारे अन्नाला ऊर्जेमध्ये बदलण्यासाठी बनवले जाते आणि वापरले जाते.

मज्जासंस्था, पचनसंस्था आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत.

खाद्याद्वारे पुरवठा. मात्र बहुतेक जनावरांना पुरेशा प्रमाणात खाद्यातून नियासिन उपलब्ध होत नाही.

कमतरतेची लक्षणे ः

वजन कमी होणे, तोंडात फोड येणे, त्वचेसंबंधी विकार जसे जळजळ आणि व्रण अशा समस्या.

हगवण लागणे.

पँटोथिनिक ॲसिड (जीवनसत्त्व बी ५) ः

चयापचय क्रियेसाठी आवश्यक.

चाऱ्या व्यतिरिक्त, शेळ्यांमध्ये आणखी एका पॅन्टोथेनिक ॲसिडचा स्रोत असतो, कारण रुमेनमधील सूक्ष्मजीव पॅन्टोथेनिक ॲसिडचे संश्‍लेषण करू शकतात.

कमतरतेची लक्षणे ः

पाय सुन्न होतात. पोटात जळजळ होते.

जास्त प्रमाणात थकवा येतो, अस्वस्थता, पोटदुखी, अतिसार, मळमळ, उलट्या आणि भूक लागत नाही.

पायरीडॉक्सिन (जीवनसत्त्व बी ६) :

मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. हिमोग्लोबीन उत्पादनास मदत करून ॲनिमिया प्रतिबंधित आणि उपचार करू शकते.

कमतरतेची लक्षणे ः

मायक्रोसायटिक ॲनिमिया, इलेक्ट्रो एन्सेफॅलोग्राफिक विकृती, चीलोसिससह त्वचारोग आणि ग्लोसिटिस (सुजलेली जीभ) आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती.

कमतरता दिसताच पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

बियोटीन (जीवनसत्त्व बी ७) :

शरीरातील कार्बोहायड्रेट्स, चरबी आणि अमिनो ॲसिडचे चयापचय करण्यासाठी बायोटिनची आवश्यकता.

प्रथिनांचा मुख्य घटक. केस आणि नखे मजबूत करण्यासाठी आवश्यक.

शेळ्यांच्या आहारातील बायोटिन ॲडिटिव्हमुळे पिलांना जन्म देण्याचे प्रमाण वाढते, जन्मलेल्या पिलाचे वजन, वाढते. शेळीच्या दुधाचे उत्पन्न आणि कोरड्या पदार्थांचे सेवन लक्षणीयरीत्या वाढते.

फोलेट (जीवनसत्त्व बी ९)

शरीरातील डीएनए आणि आरएनए तयार करण्यास मदत.

प्रथिने चयापचयाच्या कार्यामध्ये सहभाग. सामील आहे. अमिनो आम्लास तोडण्यात महत्त्वाची भूमिका.

जीवनसत्त्व बी १२ आणि जीवनसत्त्व सी सोबत कार्य. ज्यामुळे शरीराचे विघटन, वापर आणि नवीन प्रथिने तयार करण्यात मदत होते.

लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत, अशक्तपणा टाळण्यास मदत.

कोबालामीन (जीवनसत्त्व बी १२)

नैसर्गिकरीत्या अन्नामध्ये आढळते. हे पदार्थ किंवा पूरक पदार्थांमध्ये देखील जोडले जाऊ शकते.

लाल रक्तपेशी आणि डीएनए तयार करण्यासाठी आवश्यक.

मेंदू आणि मज्जातंतू पेशींच्या कार्यात आणि विकासामध्ये प्रमुख घटक.

पेशीचे चयापचय, मज्जातंतूचे कार्य आणि डीएनएचे उत्पादन तसेच पेशींच्या आत असलेले रेणू जे आनुवंशिक माहिती वाहतात यात महत्त्वाची भूमिका.

जीवनसत्त्व बी १२ च्या अन्न स्रोतांमध्ये पोल्ट्री, मांस, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश.

कमतरतेची लक्षणे ः

हेमॅटोलॉजिकल लक्षणांच्या अनुपस्थितीत न्यूरोसायकियाट्रिक सिंड्रोम होऊ शकतो.

जीवनसत्त्व सी :

शरीराच्या सर्व भागांतील उतींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक.

त्वचा, स्नायुबंध, अस्थिबंधन आणि रक्तवाहिन्या बनवण्यासाठी आवश्यक.

शरीरात प्रथिन तयार करते, जखमा बरे करते.

कमतरतेची लक्षणे ः

जनावराला स्कर्व्ही रोग होतो, शरीरात जखम होते.

हिरड्या आणि दातांच्या समस्या तयार होतात.

कोरडे केस आणि त्वचा, शरीरात अशक्तपणा होतो.

- डॉ. आर. बी. अंबादे, ८३५५९४२५४६

(सहायक प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परेल, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT