Animal Care
Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal feed : उन्हाळ्यात जनवारांच्या आहाराची कशी काळजी घ्यावी?

Team Agrowon

डॉ. पुष्पनाथ चौगुले

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होते, त्यामुळेच खाद्यामध्ये आकस्मित बदल दिसून येतात. जनावरांना निकृष्ट प्रतीचे खाद्य मिळाल्यामुळे जनावरे रवंथ करायची बंद होतात व अपचनासारखे आकस्मित आजार होतात.

यामुळे चारा कमी खाणे किंवा पूर्णपणे बंद करणे असे प्रकार दिसून येतात. याच गोष्टीचा एकत्रित परिणाम वजनावर, दुग्ध उत्पादनावर आणि प्रजनन क्षमतेवर होतो.

१) उन्हाळ्यामध्ये वातावरणामधील उष्णता वाढते, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर क्रियेवर ताण येतो. तापमान नियंत्रणासाठी जनावरे खाद्य कमी खातात व पाणी अधिक पितात.

२) उष्णतेच्या लाटेमध्ये उष्माघाताची वारंवारता अधिक असते. यामुळे शरीराची कातडी कोरडी पडते. खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. जनावरे थकून जातात, संकरित जनावरांमध्ये नाकातून रक्त वाहते. अशावेळी व्यवस्थापन करताना जनावरांच्या डोक्यावर थंड पाणी ओतावे.

पिण्याच्या पाण्यामध्ये इलेक्ट्रो लाईट्स वाढवावे. याच बरोबर जनावरांच्या अंगावर थंड पाणी ओतावे. जनावरांच्या पाठीवर ओला सुती कपडा किंवा स्वच्छ गोणपाट टाकल्याने शरीराला थंडावा मिळतो. गोठ्यातील तापमान नियंत्रित करण्यासाठी हवा येणाऱ्या दिशेला ओला कपडा लावावा.

३) जनावरांमध्ये १० अंश सेल्सिअस ते २६ अंश सेल्सिअस हे तापमान उत्पादनासाठी योग्य समजले जाते. वातावरणामधील तापमान ज्या वेळेस जास्त होते, त्यावेळेस जनावरे आपल्या शरीराचे तापमान धर्म ग्रंथी किंवा धापण्याच्या प्रक्रियेद्वारे त्यांच्या शरीरातील तापमान नियंत्रित करत असतात.

ज्यावेळी वातावरणातील तापमान या कक्षेबाहेर जाते त्यावेळी जनावराला आपल्या शरीरावर होणारा विपरीत ताण सहन करावा लागतो. यामुळे जनावरांच्या शरीरात तयार होणारी ऊर्जा जास्त भार वाढवते आणि याचा परिणाम निसारण प्रक्रियेद्वारे होतो.

४) वातावरणातील तापमान वाढल्यामुळे जनावरांचे डोळे लाल होतात.डोळ्यातून पाणी गळते. पित्ताचा त्रास होऊन अपचन होते. जनावरांचा आहार कमी होऊन भूक मंदावते. श्वसनाचा दर वाढून धाप लागल्यासारखे होते. जनावराची कातडी कोरडी पडते. जनावरांना अति पिवळसर लघवी होण्याचे प्रमाण वाढते व लघवीचे प्रमाण कमी होते.

५) उन्हाच्या ताणाच्या काळात गोठा हवेशीर असावा. जनावरांना सरासरीपेक्षा जास्त जागा उपलब्ध करून द्यावी.गोठ्याच्या छताची उंची जास्त असावी. छतावर पालापाचोळा टाकल्यास उष्णतेचे प्रमाण कमी होते.

गोठ्यामध्ये पंखे लावल्यामुळे हवा खेळती राहते.जनावरांना चारा सकाळी आणि संध्याकाळी द्यावा जेणेकरून अतिरिक्त ताण पडणार नाही.योग्य प्रमाणामध्ये क्षारांचा समतोल साधावा.

६) दुपारच्या वेळी हिरवा मका, चवळी, कडवळ, लसूणघास यासारखी पोषक वैरण द्यावी. खाद्यातून क जीवनसत्त्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा द्यावा. दिवसातून चार ते पाच वेळेस थंड पाणी पाजावे.कडबा किंवा कोणताही चारा देताना त्याची कुट्टी करूनच द्यावी जेणेकरून जनावरांवर चारा चावण्याचा अतिरिक्त ताण पडणार नाही.

७) उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध नसल्यास पर्याय म्हणून झाडपाला व टाकाऊ भाजीपाल्याचा पशू आहारात वापर करावा. यासाठी आंबा, वड, पिंपळ, बाभूळ, सुबाभूळ, अंजन, चिंच इत्यादी उपलब्ध झाडपाल्याचा योग्य प्रमाणात वापर करावा.

८) टाकाऊ भाजीपाल्यामध्ये मेथी, पालक, पानकोबी, फुलकोबी, गाजर, मुळा इत्यादींचा वापर करावा.

(श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी,जि. कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

SCROLL FOR NEXT