Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : त्वचेचा नमुना पॉझिटिव्ह

मांडवे येथे बैलामध्ये लम्पी स्कीनसदृश लक्षणे त्वचेचा नमुना पॉझिटिव्ह; प्रकृती मात्र व्यवस्थित खेड

टीम ॲग्रोवन

(जि. रत्नागिरी) ः तालुक्यातील मांडवे येथील लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease)आजार सदृश लक्षणे आढळलेल्या बैलाच्या स्वॅबच्या (Swab Test) तीन नमुन्यांपैकी त्वचेचा नमुना पॉझिटिव्ह Positive Sample) आला आहे; मात्र त्या बैलाची प्रकृती व्यवस्थित असल्यामुळे शेतकऱ्यांनी निःश्‍वास सोडला आहे.

तरीही पशुविभाग दक्ष असून आजुबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. तालुक्यातील मांडवे येथील डोईफोडे या शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजारसदृश्य लक्षणे आढळून आली होती.

त्या पार्श्‍वभूमीवर तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ त्या बैलांचे रक्त नमुने, नोझल नमुने आणि त्वचेचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेत (डीआयएस)) पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून रक्त आणि नोझलचे दोन्ही स्वॅबचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.

मात्र त्वचेचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. ज्या दिवशी त्या जनावरांमध्ये ही लक्षणे आढळून आली त्या दिवसापासून त्या बैलाला इतर जनावरांपासून वेगळे ठेवण्यात आले होते. औषधोपचार सुरू करण्यात आले होते. त्यामुळे त्याची प्रकृती उत्तम आहे.

सद्यःस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून मांडवे पंचक्रोशीपासून आजूबाजूच्या पाच किमीच्या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे लसीकरण करण्यावर पशु विभागाने भर दिला आहे, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी दिली.

तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेऊन पंचक्रोशीतील सर्व गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करणे, फवारणी करणे, लसीकरण करणे अशा विविध बाबतीत स्थानिक ग्रामस्थांना पशुसंवर्धन विभागामार्फंत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Farming : नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक तरतुदींसाठी प्रयत्न करू

Parbhani Water Crisis : परभणी जिल्ह्यातील चार लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली

Daryapur Drought : दर्यापुरात कोरडा दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance : जूनमधील पीक नुकसानीसाठी साडेआठ लाख मंजूर

Smart Village : तंत्रज्ञानाचा अवलंब करून गाव समृद्ध करा : डॉ. ससाणे

SCROLL FOR NEXT