FMD Disease Agrowon
काळजी पशुधनाची

FMD Vaccination : सांगलीत दीड लाख जनावरांना लाळ्या खुरकूतचे लसीकरण

Animal Disease : जिल्ह्यातील जनावरांना लाळ्या खुरकतचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठि जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील जनावरांना लाळ्या खुरकतचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठि जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. आजअखेर १ लाख ५८ हजार ८२१ जनावरांना लसीकरण केले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली.

जिल्ह्यात गायींची संख्या ३ लाख २४ हजार ७५६ तर म्हशींची ४ लाख ९३ हजार ९९८ अशी एकूण ८ लाख १८ हजार ७५४ जनावरांची संख्या आहे. दरवर्षी प्रतिवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान (एफ. एम. डी.) तोंडखुरी पायखुरी/लाळ्या खुरकूत या रोगाची लागण जनावरांना होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून या रोगाचे लसीकरण केले जाते.

मात्र जिल्ह्यात ४० हजार लाळ्या खुरकूतच्या लसी शिल्लक होत्या. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने कारखाना आणि जिल्ह्याच्या सीमेवरील १२ हजार जनावरांना लसीकरण केले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शासनाकडून ६ लाख ९५ हजार ९०० लसी पशूसंवर्धन विभागाला प्राप्त झाल्या.

त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या मागणीनुसार लसींचा पुरवठा केला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात जनावरांना लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. आजअखेर ७२ हजार ८४८ गाई तर ८५ हजार ९७३ म्हशी अशा एकूण १ लाख ५८ हजार ८२१ जनावरांना लसीकरण केले आहे.

उर्वरित जनावरांचे लसीकरण लवकरच पूर्ण केले जाणार आहे. तसेच जिल्ह्यात शेळ्या मेंढ्यांची संख्या ५ लाख ८४ हजार ८०० असून १७ हजार ८२५ शेळ्या मेंढ्यांना पीपीआरचे लसीकरणही केले आहे.

जिल्ह्यातील एकूण पशुधन

गाय ३ लाख २४ हजार ७५६

म्हैस ४ लाख ९३ हजार ९९८

शेळी ४ लाख ५४ हजार १२५

मेंढी १ लाख ३० हजार ७५४

जिल्ह्यातील जनावरांना ‘लाळ्या खुरकूत’ची लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच शेळ्या-मेंढ्यांनाही पीपीआरचे (पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स) लसीकरणही सुरू केले आहे. सर्व जनावरांचे लकवर लसीकरण पूर्ण केले जाईल.
- डॉ. अजय थोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, मिरज (सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT