Goats Deworming
Goats Deworming  Agrowon
काळजी पशुधनाची

शेळ्यांच्या पोटात जंत येतात कुठून?

Roshani Gole

पशुधनाचे ठराविक अंतराने जंतनिर्मुलन करणे गरजेचं असते. जंतनिर्मुलन केल्याने जनावरांची पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. शेळ्या चरून स्वतःचे पोट भरत असल्याने, अनेक प्रकारचे कृमी त्यांच्या पोटात जाऊन बसतात.

जंताचे गोल, चपटे आणी पर्णाकृती असे तीन प्रकार येतात. चरत असताना गवताद्वारे शेळ्यांच्या शरीरात जंताचा प्रवेश होत असतो. शेळ्यांच्या लेंड्याबरोबर पोटातील जंतांची अंडी बाहेर पडत असतात. अनुकूल हवामान भेटल्यावर या अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या गवताच्या पात्यांवर जाऊन बसतात. शेळी जेव्हा हे गवत खाते, तेव्हा गवताबरोबर अळ्याही पोटात जातात. पोटात अळीचे रुपांतर जंतामध्ये होते. शेळ्यांच्या आतड्यामध्ये जंताचे जीवनचक्र पुन्हा सुरू होते.

शेळ्यांच्या आतड्यामध्ये कृमी जाऊन बसत असल्याने, शेळ्यांची प्रतिकारक्षमता कमी होते. हे कृमी आतड्यातील अन्नाचे शोषण करीत असल्याने शेळ्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. परिणामी शेळ्यांची मरतुक होण्याची शक्यता वाढते.

शेळ्या सतत एकाच ठिकाणी चरायला नेऊ नये. चरण्याची जागा आठवड्याला किंवा १५ दिवसांच्या अंतराने बदलत राहावी. त्यामुळे कृमींचे जीवनचक्र पूर्ण होणार नाही. शेळ्यांना जंताचे औषध देताना पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. काही विशिष्ट औषधे ही विशिष्ट प्रकारच्या जंतावरच प्रभावी असतात. आणि प्रमाणित, सांगितलेल्या मात्रेत दिल्यानंतरच त्याचा प्रभाव दिसून येतो.

जंतनाशकाचे औषध गोळ्या स्वरूपातील देताना खाद्यातून द्याव्यात. पातळ औषध असल्यास ते औषध तोंडावाटे पाजावी लागतात. औषध पाजताना जनावरांना ठसका लागणार नाही, याची काळजी घ्यावी. हळूहळू शोषली जाणारी जंतनाशके जनावराच्या कोठी पोटामध्ये ठेवली जातात व हळूहळू अनेक दिवस शोषली जातात. पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये शेळीची लेंडी तपासून त्यातील जंताचे प्रमाण आणि जंतांची जात सांगण्याची सोय उपलब्ध आहे. शेळ्यांना जंताचा प्रादुर्भाव झालाय कि नाही तपासण्यासाठी शेळ्यांच्या लेंडीखताची तपासणी केल्यास फायदा दिसून येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT