Control measure for external parasites.
Control measure for external parasites. Agrowon
काळजी पशुधनाची

शेळ्यांचे गोचीडांपासून संरक्षण कसे कराल ?

Roshani Gole

गोचिडच्या चाव्यामुळे जनावरांना टिक पॅरॅलिसिस (Tick Paralysis) नावाचा आजार होण्याची शक्यता असते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्याने शेळ्या-मेंढ्यांना ॲनिमिया (anemia) होण्याची शक्यता असते. गोचीडांची (ticks) संख्या जास्त असल्यास त्यांना गोचीड ताप हा आजारही होऊ शकतो. गोचीड बाधेमुळे जनावरांना विविध आजाराची बाधा होऊन, मांस आणि दूध (milk) उत्पादनात घट दिसून येते. उष्ण दमट वातावरणात तर गोचीडांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.

गोचीड जनावरांच्या कातडीला चिकटून रक्त शोषून घेतात. एक गोचीड एका आठवड्यात अर्धा ते एक मिलीपर्यंत रक्त शोषत असते. गोचीड कानाच्या आतील भाग, शेपटीचा गोंडा, शेपटीच्या खालील भाग, कासेचा तसेच मानेच्या खालील भाग यांसारख्या शरीर अवयवांवर आढळून येते. याव्यतिरिक्त गोचीड आणि त्यांची अंडी गोठ्यात, जमिनीवर, गव्हाणीतील भेगा याठिकाणीही आढळून येतात.

गोचीड निर्मुलन करताना फक्त जनावरांच्या शरीरावरील गोचीड निर्मुलन करून चालत नाही. या सोबतच गोठ्यातील, आजूबाजूच्या परिसरातील गोचीड असूया अंड्यांचाही नायनाट करावा लागतो.

गोचीड निर्मुलनासाठी विविध पद्धतींचा वापर केल्यास, चांगला फायदा दिसून येतो. यामध्ये रासायनिक, भौतिक आणि जैविक पद्धतींचा समावेश होतो. रासायनिक पद्धतीमध्ये विविध प्रकारच्या किटकनाशकांचा वापर केला जातो. मात्र किटकनाशकांचा वापर करताना त्याची मात्रा योग्य प्रमाणातच वापरली गेली पाहिजे. भौतिक पद्धतीमध्ये गोठ्यातील गोचीडांची अंडी टेंभ्याच्या किंवा फ्लेम गणच्या साहाय्याने जाळली जातात. गोठ्यातील सर्व फटी, भेगांमधील अंडी जाळून टाकली जातात. जैविक पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर केला जातो.

तिन्ही पद्धतींचा एकत्रित वापर गोचीड नियंत्रणासाठी केल्यास चांगला फायदा दिसून येतो, यालाच एकात्मिक व्यवस्थापन असे देखील म्हटलं जातं.

शेळ्या किंवा मेंढ्यांना कुरणावर चरायला नेताना क्षेत्रांची फेरपालट करावी. मोठी कुरणे असल्यास, त्यांची विभागणी करून सुरुवातीला एका भागावर तर काही दिवसांनी दुसऱ्या भागांवर चरायला सोडावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT