Bluetongue Disease Of Sheep and Goat
Bluetongue Disease Of Sheep and Goat Agrowon
काळजी पशुधनाची

या आजारात होते शेळ्यांची जीभ निळी !

Team Agrowon

शेळ्यांना विषाणूमुळे होणाऱ्या आजारांमध्ये ब्ल्यूटंग, बुळकांडी आणि मावा या आजारांचा समावेश होतो. ब्ल्यू टंग (Blue-Tongue) या आजारात शेळ्यांची जीभ निळी होते. ओरबीव्हायरस (Orbivirus) नावाच्या विषाणूमुळे शेळ्यांमध्ये या रोगाची बाधा होत असते.

क्युलीकॉईडस (Culicoides)नावाच्या डासांमुळे या रोगाचा प्रसार होतो. या डासांच्या लाळ ग्रंथीमध्ये या ओरबीव्हायरस (Orbivirus) विषाणूंची वाढ होते. या रोगाची बाधा प्रामुख्याने पावसाळ्याच्या शेवटी, डासांची संख्या वाढल्याने होत असते.

या आजारात जनावराला तीव्र स्वरूपाचा ताप येतो. तापाची तीव्रता १०४ ते १०६ अंश फॅरेनहाईटपर्यंत असते. ताप पाच ते सात दिवसापर्यंत राहतो. बाधित शेळ्या-मेंढ्याच्या नाकातून स्त्राव येतो. डोळ्यातून सतत पाणी येत राहते. तोंडातून लाळ गळत राहते. शेळ्या-मेंढ्याची जीभ सुजून काळी-निळी पडते. म्हणून या आजाराला आपण नीलजिव्हा किंवा ब्ल्यूटंग (Blue Tongue) असेही म्हणतो. जनावरांच्या तोंडाला आणि खुरांना सूज येते. काही वेळेस खुरे वेगळी झाल्याने, जनावरे लंगडायला लागतात. गाभण शेळ्या-मेंढ्यामध्ये गाभ जाण्याची शक्यता असते.

ब्ल्यू टंग हा विषाणूमुळे होणारा रोग असल्याने, यावर ठराविक औषधोपचार उपलब्ध नाहीत. उपचार करताना पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच प्रतीजैविके द्यावीत. जखमा निर्जंतुक पाण्याने स्वच्छ धुऊन त्यावर मलम लावावे.

हा विषाणूजन्य आजार असल्याने उपचारापेक्षा प्रतिबंध बरा, या युक्तीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास चांगला फायदा दिसून येईल. डासांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी शेळ्यांना चरायला सोडू नये. पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो. जास्त पाऊस पडणाऱ्या भागात, पाणी साचून राहणाऱ्या भागात शेळ्या-मेंढ्यांना चरायला पाठवू नये. गढूळ पाण्याची डबकी बुजवून घ्यावीत. शेळ्यांचा गोठा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. गोठ्यात नियमितपणे जंतूनाशकाची फवारणी करून घ्यावी. गोठ्यात ओलावा जास्त काळ राहत असल्यास, चुना (Lime) मारून घ्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT