Sahiwal Heifer Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : भ्रूण प्रत्यारोपणातून साहिवाल कालवडीचा जन्म

कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून साहिवाल कालवडीचा जन्म झाला. कालवडीचे वजन २७.४०० किलो आहे. भ्रूण प्रत्यारोपण होलस्टीन फ्रिजियन गाईमध्ये करण्यात आले होते.

टीम ॲग्रोवन

पुणे ः कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये (Indigenous Cow Research Training Center) भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून (Embryo Transplantation Technology) साहिवाल कालवडीचा जन्म (Sahiwal Heifer Birth) झाला. कालवडीचे वजन २७.४०० किलो आहे. भ्रूण प्रत्यारोपण होलस्टीन फ्रिजियन (HF Cow) गाईमध्ये करण्यात आले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून पहिल्यांदाच साहिवाल कालवडीचा जन्म झाला आहे, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.

पशुतज्ज्ञ डॉ. प्रमोद साखरे म्हणाले, ‘‘भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे जन्मलेल्या साहिवाल जातीच्या कालवडीचा पिता ‘बाएफ करीम’ असून वळूमाता लक्ष्मी हिचे प्रती वेत दूध उत्पादन ४,८०० लिटर आणि दाता गाईचे ( एनडीडीबी १६००५०२५०२६२) प्रति वेत दूध उत्पादन ४,३८४ लिटर आहे.’’

प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे म्हणाले, ‘‘हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने २०२०-२०२४ या कालावधीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारला आहे. महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राद्वारे विद्यापीठ प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरवात केली. या प्रकल्पांतर्गत १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे. हा प्रकल्प राहुरी येथील एनडीडीबी सिमेन स्टेशनच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.’’

विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे, डॉ. सुनील अडांगळे आणि डॉ. शिवकुमार पाटील यांचे सहकार्य लाभले.

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत होणे आवश्यक आहे. यातून गावठी किंवा संकरित गाईंद्वारे उच्च वंशावळीच्या देशी गाईंच्या कालवडी शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार होतील. यामुळे दुधाळ आणि चांगली रोग प्रतिकारक क्षमता असणाऱ्या देशी गाईंची संख्या वाढण्यास मदत होईल. विद्यापीठाच्या प्रकल्पांतर्गत गीर, साहिवाल जातीच्या कालवडी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे तयार झाल्या आहेत. याच बरोबरीने थारपारकर, लाल सिंधी व राठी गाईमध्ये संशोधन सुरू आहे.
डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: मॉन्सून पुढे सरकला; राज्यात पावसाचा अंदाज

Farmers Protest: संतप्त शेतकऱ्यांचा मध्यरात्री वीज उपकेंद्रावर धडक मोर्चा

Waiting For Rain: पावसाच्या प्रतीक्षेत खरीप हंगामाची चिंता

Maharashtra Supplementary Demands : ९७ हजार ७०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या; शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार कोटींची पुरवणी मागणी

Jamun Processing Equipment: जांभूळ गर, बीज निष्कासन यंत्राची उपयुक्तता

SCROLL FOR NEXT