Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : म्हैसपूरच्या आदर्श गोसेवा प्रकल्पात पशुरोग निदान

Animal Health : स्थानिक म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा प्रकल्पात विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून निःशुल्क पशुरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले.

Team Agrowon

Akola News : स्थानिक म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा प्रकल्पात विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून निःशुल्क पशुरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या साठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व पशुसंवर्धन विभागानेही मदत केली.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, ‘माफसू’चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जयेश जरीवाला, आदर्श गोसेवा प्रकल्पाचे अध्यक्ष सुभाष जैन, ‘माफसू’चे शिक्षण संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चैतन्य पावशे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, डॉ. नरेंद्र अरबट, ॲड. मोतीसिंह मोहता उपस्थित होते.

शिबिरामध्ये २३२३ लहान मोठ्या पशूंची चिकित्सा, लसीकरण, शस्त्रक्रिया, नसबंदी, फॅक्चर, वंधत्वासंबंधी निवारण करण्यात आले. यात ९२ जनावरांवर मोठी शस्त्रक्रिया झाली. तसेच विविध उपचार व औषधोपचार करण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्या ५०० पशुपालकांना जंत निर्मूलन औषध, चाटण विटा व उत्कृष्ट पशुखाद्य, क्षार मिश्रणाचे वितरण करण्यात आले.

आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) आणि मानव सेवा व अबोल जीवन मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई), श्रीमती मंजुदेवी मांगीलालजी चौहान (भिनमाल), श्रीमती पवनबाई हस्तिमल राजावत (मिरा स्टील एलएलपी) खुडाला यांच्या आर्थिक सहाय्याने तसेच आदर्श गोसेवा आणि संशोधन प्रकल्प (म्हैसपूर),

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (नागपूर) व पशू संवर्धन विभागातर्फे हा कार्यक्रम झाला. आदर्श गोसेवा संस्थेचे सचिव विवेक बिडवई, डॉ. कुलदीप देशपांडे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी आदींनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT