Vaccination Of Animals Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : मॉन्सूनपूर्व लसीकरणाला गती

Animal Care : गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळ्या, मेंढ्यांना लसीकरण केले जात आहे. तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

Team Agrowon

Kolhapur News : तालुक्यात मॉन्सूनपूर्व लसीकरण मोहीम गतीने राबवली जात आहे. पावसाळ्यात जनावरांना होणारे घटसर्प, फऱ्या रोगाचे लसीकरण केले जात आहे. तालुक्यातील नऊ पशुवैद्यकीय दवाखान्यांतील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यामध्ये व्यग्र आहेत. गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळ्या, मेंढ्यांना लसीकरण केले जात आहे.

तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीपूरक व्यवसायही येथे केले जातात. तालुक्यात पशुपालकांची संख्याही मोठी आहे. गायवर्गीय सहा हजार ९८२ जनावरे आहेत. म्हैसवर्गीय २७ हजार ८३८ जनावरे आहेत. तालुक्यात म्हैस, गाय, बैल व रेडा यांची संख्या ३४ हजार ८२० आहे.

शेळ्या-मेंढ्याची संख्या सुमारे ९ हजार ५५ आहे. या जनावरांच्या आरोग्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्यांमध्ये जनावरांच्या आजाराबाबत जनजागृती, प्रबोधन केले जाते. जनावरांचे व्यवस्थापन व काळजी कशी घ्यावी याबाबत आवश्यक माहिती दिली जाते.

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर गाय, बैल, म्हैस व रेडा या जनावरांमध्ये पसरणाऱ्या घटसर्प, फऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. प्रामुख्याने नदीकाठची गावे, धनगरवाडे यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

शेळ्या, मेंढ्यांना अत्रविषार हा रोग होत असल्याने त्यांचे लसीकरण केले जात आहे. तालुक्यात लसीकरण अंतिम टप्यात आहे. आजरा, भादवण, उतुर, मलिग्रे, पेरणोली, गवसे, वाटंगी, महागोंड व पोळगाव या दवाखान्यामार्फत मोहीम राबविली जात आहे.

पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, शेळ्यामध्ये अंत्रविषार असे साथीचे आजार पसरत असतात. ते रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून मॉन्सूनपूर्व लसीकरण मोहीम सुरू असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. यामुळे रोगांना प्रतिबंध करणे शक्य होईल.
- डॉ. पी. जी. ढेकळे, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, आजरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT