Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : देशभरात ‘लम्पी’मुळे सुमारे ५७ हजार गायींचा मृत्यू

गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्रानंतर आता हिमाचल प्रदेशातही ‘लम्पी स्कीन’ आजाराने धुमाकूळ घातला आहे. आंध्र प्रदेशातही काही प्रकरणे समोर आली आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्रानंतर आता हिमाचल प्रदेशातही ‘लम्पी स्कीन’ आजाराने (Lumpy Skin Disease) धुमाकूळ घातला आहे. आंध्र प्रदेशातही काही प्रकरणे समोर आली आहेत. या आजाराचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे. ताज्या माहितीनुसार, देशभरात ‘लम्पी’मुळे (Animal Death Due To Lumpy) सुमारे ५७ हजार गायींचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक ३७ हजार मृत्यू राजस्थानमध्ये झाले आहेत.

परिस्थितीवर सरकारची नजर

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले, ‘‘गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ‘लम्पी’चा प्रसार झाला आहे. आंध्र प्रदेशातही प्रादुर्भाव समोर आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.’’

मध्य प्रदेशातील ११ जिल्ह्यांत प्रादुर्भाव

मध्य प्रदेशातील ११ जिल्ह्यांत आतापर्यंत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव झाला आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५४२ जनावरे प्रादुर्भावग्रस्त आढळली आहेत. ‘लम्पी’ग्रस्त जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग सक्रिय झाला आहे. लसीकरणालाही वेग आला आहे. गेल्या २० दिवसांत ‘लम्पी’चा प्रभाव अधिक वाढला आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे संचालक डॉ. आर. के. माहिया म्हणाले, ‘‘ ११ जिल्ह्यांतील माहिती मिळविली जात आहे. राज्यात ‘लम्पी’मुळे आतापर्यंत २८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. माळवा पट्ट्यातून या आजाराची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. माळवा पट्ट्यात उज्जैन, रतलाम, मंदसौर, इंदूर, नीमच, बैतुल, खंडवा, झाबुआ, धार, अलीराजपूर आणि बुरहानपूर जिल्ह्यांचा समावेश होतो.’’

लसीकरणाला गती देण्याच्या सूचना

गायींना लस देण्याचे आवाहन रुपाला यांनी केले आहे. राज्य सरकारांना लसीकरण त्वरित करण्यास त्यांनी सांगितले आहे. रुपाला यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘गुजरातमध्ये परिस्थिती सुधारली आहे, तर पंजाब आणि हरियानामध्ये आजार नियंत्रणात आहे. राजस्थानमध्ये हा आजार वेगाने पसरला आहे. मात्र या आजाराचा सध्या दूध उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही.’’

हिमाचल प्रदेशात ‘महामारी’ घोषित करण्याची मागणी

हिमाचल प्रदेशातही आता ‘लम्पी’ पसरला आहे. ताज्या माहितीनुसार, या राज्यात २,३०९ गायींचा मृत्यू झाला आहे. तर ५५ हजार ७०० गायींना प्रादुर्भाव झाला आहे. हिमाचल प्रदेशातील १२ पैकी नऊ जिल्ह्यांमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव नोंदवला गेला आहे. या आजाराला महामारी घोषित करण्याची मागणी येथील पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT