Lampy Skin
Lampy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease Subsidy : ‘लम्पी स्कीन’मुळे मरण पावलेल्या पशुधनाच्या मालकांना साडेसात कोटींचे अनुदानवाटप

Team Agrowon

Solapur Lumpy Skin Update : सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीन (laupy Skin) बाधित जनावरांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.

या आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात गाय, बैल, वासरे असे एकूण तीन हजार १९१ पशुधन दगावले. त्या पशुधनापोटी पालकांना एकूण सात कोटी ६० लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भास्कर पराडे यांनी यासंबंधीची माहिती दिली. डॉ. पराडे म्हणाले, की लम्पी स्कीन त्वचा आजार केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा आजार आहे.

त्याच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पशुपालकांनी घाबरून जाऊ नये, यासाठी टोल फ्री क्रमांकावर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच, जिल्ह्यात जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यात १९८ इपिसेंटर उभारण्यात आले.

८ हजार ८७३ बाधित गोठे फवारणी करण्यात आले, या सर्व उपाययोजनांमुळे जिल्ह्यात लम्पी स्कीनबाधित पशुधनाची संख्या आटोक्यात आली असून, आजरोजी केवळ ५०१ पशुधनावर उपचार सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्यात ३४ हजार जनावरे बरी

सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत ३३ हजार ५२७ गाई, ५ हजार ३९१ बैल असे एकूण ३८ हजार ९१८ पशुधन लम्पी स्कीनने बाधित झाले होते.

त्यापैकी २९ हजार ९५५ गाई, ४ हजार ८५२ बैल असे एकूण ३४ हजार ८०७ पशुधन उपचाराने बरे झाले आहे, अशी माहितीही डॉ. पराडे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT