Job Opportunities in Agriculture Animal Husbandry Department  Agrowon
काळजी पशुधनाची

Job Opportunities: पशुसंवर्धन विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची ६७ पदे रिक्त

लम्पी स्कीन या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे याचा सामना करणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ६७ पदे रिक्त आहेत.

Team Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात लम्पी स्कीन (Lumpy Skin) या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे याचा सामना करणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील (Animal Husbandry Department) अधिकारी-कर्मचाऱ्यांची ६७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांवर पडत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६१० जनावरे लम्पी स्कीनने बाधित असून त्यापैकी ७१ जनावरे दगावली आहेत; मात्र या संकटाचा सामना करणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ६७ पदे रिक्त आहेत.

यामध्ये पशुधन विकास अधिकाऱ्याची १९ पदे, सहायक पशुधन विकास अधिकारी १४, पशुधन पर्यवेक्षक ४ यासह अन्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुपालकांच्या रोषाला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

पशुसंवर्धन विभागात रिक्त पदे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु तरीही उपलब्ध असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेने लम्पी स्कीन आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहेत. आतापर्यंत १६१० जनावरांना लागण झाली असून ७१ जनावरे दगावली आहेत.

- डॉ. विद्यानंद देसाई,

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT