FMD Disease Agrowon
काळजी पशुधनाची

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Animal Disease : जिल्ह्यातील जनावरांमध्ये लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील जनावरांमध्ये लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. ४० हजार ४९ जनावरांना लाळ्या खुरकुतचे लसीकरण करण्यात आले असून शेळ्यांचे पीपीआर लसीकरण ९० टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली.

जिल्ह्यात गायींची संख्या ३ लाख २४ हजार ७५६ तर म्हशींची संख्या ४ लाख ९३ हजार ९९८ अशी एकूण ८ लाख १८ हजार ७५४ जनावरे आहेत. दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत (एफ.एम.डी.) तोंडखुरी पायखुरी/लाळ्या खुरकुत या रोगांची लागण जनावरांना होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून या रोगाचे लसीकरण केले जाते. त्यानुसार जनावरांना लसीकरणाचे नियोजन केले असून लाळ्या खुरकुतच्या ८ लाख ४३ हजार ३०० लशी उपलब्ध आहेत.

पशुसंवर्धन विभागाने तालुकानिहाय लशींचा पुरवठा केला आहे. त्यानुसार प्रत्येक गावात जनावरांना लसीकरणाची मोहीम सुरू केली. जिल्ह्यातील जिल्ह्यात ८ लाख १८ हजार ७५४ पैकी ४० हजार ४९ जनावरांना लाळ्या खुरकुतचे लसीकरण करण्यात आले आहे. आजअखेर ७२ हजार ८४८ गाई तर ८५ हजार ९७३ म्हशी अशा एकूण १ लाख ५८ हजार ८२१ जनावरांना लसीकरण केले आहे.

शेळ्या-मेंढ्यांचे ९० टक्के लसीकरण

जिल्ह्यात शेळ्या मेंढ्यांची संख्या ५ लाख ८४ हजार ८७९ आहे. शेळ्या-मेंढ्यांना पीपीआरच्या लसीकरणाची मोहीम राबवली आहे. शेळ्या-मेंढ्याचे पीपीआरचे ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

घटसर्प, फऱ्या लसीकरण पूर्ण

जनावरांना पावसाळ्यात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार यांपासून प्रतिबंधक लसीकरण पावसाळ्यापूर्वी केले जाते. यंदा पशुसंवर्धन विभागाने घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार यांचे लसीकरण पूर्ण केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT