Animal Husbandry Department Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Husbandry Department : ‘पशुवंर्धन’च्या प्रसिद्धीसाठी ४ कोटी ९२ लाखांचा निधी

Government Fund : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २७० कोटी रुपयांचा आराखडा प्रचार आणि पसिद्धीसाठी मंजूर केला आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना शेतकरी, पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने प्रचार आणि प्रसिद्धीसाठी ४ कोटी ९२ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २७० कोटी रुपयांचा आराखडा प्रचार आणि पसिद्धीसाठी मंजूर केला आहे. तर कृषी विभागाने १४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मागील आठवड्यात मान्यता दिली आहे. आता पाठोपाठ पशुसंवर्धन विभागही प्रचार आणि प्रसिद्धीत स्वतःला झोकून देणार आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकरी आणि पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांमार्फत २० जून रोजी ४ कोटी ९५ लाख ९० हजार रुपयांच्या जाहिरात आराखड्याचा प्रस्ताव दाखल केला होता.

त्यानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी ३ कोटी ९२ लाख, ६१ हजार रुपयांच्या जाहिरात माध्यम आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आता दूरदर्शन, मराठी वृत्तवाहिन्या, आकाशवाणी, समाजमाध्यमे, खासगी होर्डिंग आदींच्या माध्यमातून जाहिराती करण्यात येणार आहेत.

वर्षाचा निधी निवडणुकीआधीच खर्च

विविध विभागांच्या वर्षभराच्या प्रसिद्धीसाठी ठराविक निधीची तरतूद केलेली असते. वर्षभरात हा निधी खर्च व्हावा, असे अपेक्षित असते. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीआधी सर्व पैसे खर्च करण्याकडे विभागांनी सपाटा लावला आहे.

कृषी विभागाला १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. त्यापैकी १४ कोटींच्या आराखड्याला मान्यता दिली आहे. तर पशुसंवर्धन विभागाच्या ४ कोटी ९५ लाखांपैकी ४ कोटी ९२ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT