Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Census : धुळे जिल्ह्यात २१ वी पशुगणना

Animal Care : सप्टेंबर ते डिसेंबर-२०२४ या कालावधीत संपूर्ण भारतात २१ वी पशुगणना केली जाणार आहे.

Team Agrowon

Dhule News : सप्टेंबर ते डिसेंबर-२०२४ या कालावधीत संपूर्ण भारतात २१ वी पशुगणना केली जाणार आहे. या पशुगणनेमध्ये प्रत्येक शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घराला भेट देऊन प्रगणक त्यांच्या पशुधनाची माहिती, पशुसंवर्धन विषयक व्यवसाय, उ‌द्योजकता, रोजगार, दुध उत्पादन आदी माहिती संकलित करतील.

पशुपालक, नागरिकांनी पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी केले आहे. पशुसंवर्धन विभाग ग्रामीण क्षेत्रामध्ये व्यवसाय, रोजगार निर्मिती तसेच पशुपालकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

देशात पशुधनाचा राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये भरीव वाटा असून, त्यापासून भारतीय अर्थकारणाला चालना मिळते. संपूर्ण भारतातील पशुधनाची संख्या, पशुसंवर्धनावर आधारित रोजगारनिर्मिती, व्यवसाय, अर्थकारण या सर्व बाबींची तपशीलवार माहिती पंचवार्षिक स्वरूपात पशुगणने‌द्वारे एकत्र केली जाते.

पशुधनास बिल्ला हवा

मोबाईल ऍप्लिकेशच्या माध्यमातून ही पशुगणना केली जाणार आहे. पशुगणनेसाठी पशुपालकांकडील मोठ्या पशुधनास कानावर बारा आकडी पिवळ्या रंगाचा प्लॅस्टिकचा टॅग लावलेला असावा व त्याची ऑनलाइन नोंद झालेली असावी, असे अपेक्षित आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशूच्या कानावर ओळख बिल्ला लावणेसाठी निरंतर कार्यवाही सुरू आहे.

यासाठी देखील पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून पशुधनाच्या कानावर बिल्ला मारून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. म्हणजे जातिनिहाय पशुधनाची गणनात त्यांनी नोंद करता येईल.

या पशुगणनेमध्ये गोवर्ग, म्हैशवर्ग, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, ससे, कुत्रा तसेच गावातील भटके गोवर्गीय पशुधन, कुत्रे यांची देखील गणना केली जाणार आहे. सर्व पशुपालकांनी, शेतकरी तसेच प्रत्येक शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबीयांनी आपल्या घरी पशुगणनेसंदर्भात येणाऱ्या व माहिती घेणाऱ्या प्रगणकांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भणगे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT