Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नांदेडमध्ये १७१ जनावरे ‘लम्पी स्कीन’ने बाधित

तीन लाख जनावरांना लसीकरण

टीम ॲग्रोवन

नांदेड : नांदेड जिल्ह्यात लम्पी (Lumpy Skin) बाधित पशुधनाची (Livestock) संख्या १७१ झाली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर (Vaccination) अधिक भर दिला आहे. गुरुवारी (ता. २९) जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन ३१ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात तीन लाख १७ हजार ८१८ जनावरांना लसीकरण करण्यात आले.

लम्पी स्कीन हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर कीटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील ४५ गावे लम्पी स्कीन बाधित आहेत. या ४५ गावातील पशुधन २२ हजार ७१५ आहे. यातील १७१ बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या पाच किलोमीटर परिघातील गावांची संख्या २८३ आहे. एकूण बाधित गावे ३२८ झाली आहेत.

या बाधित ४५ गावांच्या पाच किलो मीटर परिघातील ३२८ गावांतील जनावरांची संख्या ९२ हजार ४०० आहे. ‘लम्पी’मुळे १३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. उपलब्ध लस मात्रा तीन लाख

७८ हजार २५० असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशूची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT