Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : अमरावती जिल्ह्यातील दहा गावे नियंत्रित क्षेत्र जारी

जनावरांमधील लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धारणी, चिखलदरा व अचलपूर या तीन तालुक्यांतील एकूण दहा गावांमध्ये नियंत्रित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

अमरावती : जनावरांमधील लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाच्या (Lumpy Skin Disease) पार्श्वभूमीवर धारणी, चिखलदरा व अचलपूर या तीन तालुक्यांतील एकूण दहा गावांमध्ये नियंत्रित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केले आहेत.

धारणी तालुक्यातील मौजे सावलीखेडा, सोनाबर्डी, बाबंदा, धुळघाट रोड, झिल्पी व पाडिदम, तसेच चिखलदरा तालुक्यातील मौजे पिपादरी, अंबापाटी आणि अचलपूर तालुक्यातील मौजे धामणगाव गढी, व वडगाव फत्तेपूर येथील पशुधनामध्ये गो व म्हैस या वर्गातील जनावरांना होणाऱ्या लम्पी चर्मरोग या विषाणूजन्य त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या आजारामुळे जनावरांची कार्यक्षमता कमी होते.

परिणामी दूध उत्पादन कमी होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्याबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी प्रस्ताव सादर केला, त्यानुसार या दहा गावांमध्ये नियंत्रित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम १२ व १३ अन्वये या नियंत्रण क्षेत्राच्या १० किलोमीटर परिघात जनावरांचे बाजार, वाहतूक, जत्रा व प्रदर्शन, बैलांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Agriculture Day: कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘शाश्‍वत शेती दिन’ 

Carbon Farming: कार्बन शेती पर्यावरणासाठी फायदेशीर

Khadakpurna Dam: खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ

Cotton Crop Loss: लाखेगाव येथे कपाशी पिकाला ‘आकस्मिक’ संकटाचा फटका

Onion Subsidy : २०२३ च्या कांदा अनुदानासाठी २८ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT