Chana Irrigation
Chana Irrigation  
ॲग्रो गाईड

Chana Irrigation : हरभऱ्यासाठी तुषार सिंचन फायदेशीर का आहे?

Team Agrowon

हरभरा हे पीक (Chana Crop) पाण्यास अतिशय संवेदनशील पीक आहे. हरभरा पिकाला साधारण पणे २५ सें.मी पाण्याची आवश्यकता असते. हरभरा पिकाला तुषार सिंचन (Sprinkler Irrigation) पद्धतीन पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे हरभऱा पिकासाठी तुषार सिंचन पद्धत फायदेशीर मानली जाते.  

हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण फायदेशीर का आहे? याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.  

तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकाला पाहिजे तेवढे आवश्यक त्या वेळेला पाणी देता येतं. सारा,पाट, वरंबा यासारख्या पद्धतीन पाणी दिल्यास जमीन दाबून बसते.

जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो व त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. 

तुषार सिंचनाने जमीन नेहमी भुसभुशीत राहते. कोणतीही मशागत अतिशय सुलभ करता येते. अगोदर तुषार सिंचनाने जमीन ओलवून मशागत केली आणि तीफण किंवा पाभरीच्या सहाय्याने काकऱ्या पाडून हरभरा बियाणे टोकन केले तर पिकाची उगवण अतिशय चांगली होते. 

तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास शेतामध्ये सारा, पाट, वरंबा पाडण्याची गरज नसते. पर्यायाने यावरील खर्चात बचत होते.

पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते.

नेहमीच्या पद्धतीत पिकाला अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मूळकूज सारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते.

परंतु तुषार सिंचनाने पाणी योग्य प्रमाणात देता येत असल्याने मूळकूज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येतं. 

नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीत जास्त पाण्यामुळे पिकास दिलेली खते, अन्नद्रव्य वाहून किंवा खोलवर जाण्याची शक्यता असते.

शिवाय वाफसा लवकर येत नसल्याने अन्नद्रव्ये, खते पिकाला उपलब्ध होतीलच याची खात्री नसते.

मात्र तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्यामुळे पिकाला दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वाफसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्य शोषणाची क्षमता वाढते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Stock : खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत

Cooperative Election : लोकसभा झाली आता गावपातळीवरचं राजकारण तापणारं, ९१ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार

Krushi Vasant Abhiyan : ‘कृषी वसंत’ अभियानाला अकोला जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू

Indrayani River : पुन्हा फेसाळली इंद्रायणी नदी!, नदीत सोडले रसायनयुक्त पाणी

Sericulture Farming : वाशीम जिल्ह्यात रेशीम शेतीकडे वाढतोय कल

SCROLL FOR NEXT