Chili, Tomato, Brinjal Pest Management Agrowon
ॲग्रो गाईड

Tomato pests: मिरची, वांगी, टोमॅटोवरील किडींसाठी काय उपाय करावेत?

सध्या मिरची, वांगी आणि टोमॅटो पिकावर ढगाळ वातावरणामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

सध्या मिरची (Chilli), वांगी (Brinjal) आणि टोमॅटो (Tomato) पिकावर ढगाळ वातावरणामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढील उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्याचा अवलंब करावा.

मिरची पिकातील फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लँनोफिक्स ५ मिली प्रति ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारावे. रसशोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सध्याच्या हवामानामुळे मिरची पिकावर पांढरी माशी व फुलकिडे यांच्यामार्फत चुरडा-मुरडा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पिकाची पाने बारीक वाकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी निस्तेज होतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे तसेच फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावावेत. रासायनिक कीडनाशकांचा वापर करायचा असल्यास फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फीप्रोनिल (५ % ई सी) १५ मिली किंवा स्पिनोसॅड (४५ ई सी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मागच्या आठवड्यात अनेक ठिकाणी असलेले ढगाळ वातावरण, आर्द्रता आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच पुढील हवामानाची स्थिती टोमॅटो पिकावरील जीवाणूजन्य करपा रोगास अनुकूल आहे. व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब (७५ डब्लू.पी) २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड (५० डब्लू.पी) २५ ग्रॅम यापैकी कोणतेही एक कीडनाशक १० लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघड दिल्यास फवारावे.

वांगी

रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी वांगी पिकामध्ये सुरवातीला ५ % निंबोळी अर्काची फवारणी कोरड्या हवामानात करावी. पिकामध्ये पहिली निंदणी करावी. पीक तण विरहित ठेवावे. ढगाळ वातावरणामुळे फुलकिडे आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंन्झोएट (५ टक्के) ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT