mango orchard Agrowon
ॲग्रो गाईड

Mango Orchard Management : आंबा बागेत अनियमित बहार येण्याची कारणे काय आहेत?

सर्वसाधारणपणे आंब्याच्या झाडाला सुरवातीची काही वर्षे नियमित फळधारणा होते परंतु जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे बहारामध्ये अनियमितता आढळून येते आणि नंतर एका वर्षा आड फळधारणा होते.

Team Agrowon

सर्वसाधारणपणे आंब्याच्या झाडाला सुरवातीची काही वर्षे नियमित फळधारणा होते परंतु जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे बहारामध्ये अनियमितता आढळून येते आणि नंतर एका वर्षा आड फळधारणा होते. अनियमित बहारामुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागते. तोतापुरी, नीलम, रत्ना, आम्रपाली आणि बारमासी या जातींना दरवर्षी फळे लागतात. तर बाकी इतर जातींमध्ये एक वर्ष आड फळे येण्याची प्रकृती दिसून येते. आंबा बागेत (Mango orchard) अनियमीत बहार येण्याची काय कारणे आहेत आणि त्यावरिल उपाय योजना काय आहेत याबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

अनियमित बहार येण्याची कारणे

अनियमित खत पाणी आणि संजीवकाचा वापर करणे.

विविध जातींमध्ये नर व उभयलिंगी फुलांचे प्रमाण स्वपरागीभवनाची क्षमता फळगळ इत्यादी अनियमित बहार विकृतीला टाळण्यासाठी मोहोर येण्याच्या काळात ढगाळ हवामानात पाऊस पडत असल्यास भुरी, करपा व तुडतुड्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी कीडनाशक तसेच बुरशीनाशकाची फवारणी करावी.

नियमित बागेची मशागत करून आवश्यक खते, पाणी यांचा पुरवठा करावा. नियमित तण नियंत्रण करावे.

बाग लावताना एका जातीची लागवड न करता दोन ते तीन जातींची लागवड करावी.

संजीवकांची फवारणी करुन फळगळ कमी करता येते. जसे एन, ए. ए. १० पीपीएम तीव्रतेच्या दोन फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी फळे वाटाण्या एवढी असताना तर दुसरी फवारणी फळे बोराएवढी झाल्यानंतर करावी.

पॅक्लोबुट्रोझोल ५ ग्रॅम प्रती झाड, झाडाच्या बुंध्याभोवती खोदलेल्या छोट्या खड्ड्यात समप्रमाणात ओतावे त्यानंतर हे खड्डे लगेच मातीने बुजवून घ्यावेत.

पर्णगुच्छ (मॅंगो मॉल फॉर्मेशन)

आंबा झाडांवर विशेषतः उत्तर भारतात या विकृतीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. अलीकडे महाराष्ट्रातही या विकृतीचे प्रमाण दिसून आले आहे. झाडावर पानांची झुबके तयार होतात. फुलांचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते आणि फळधारणा होत नाही. या विकृतीचे निश्चित कारण समजलेले नाही तरीपण या विकृतीच्या नियंत्रणासाठी रोगट भागाची सुरुवातीलाच छाटणी करून बुरशीनाशकाची फवारणी करावी. एन.ए.ए. २० पीपीएम तीव्रतेची फवारणी केल्यास या विकृतीचे प्रमाण कमी होते. कलम कडी घेताना किंवा खरेदी करताना स्थानिक भागातून घ्यावी तसेच रोगग्रस्त भागातून तसेच रोगग्रस्त झाडावरील कलम काड्या लागवडीसाठी वापरू नयेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT