African boer goat 
ॲग्रो गाईड

काय आहेत आफ्रिकन बोअर शेळीची वैशिष्ट्ये ?

आफ्रिकन बोअर (African boer)या जातीची शेळी दक्षिण आफ्रिकेत १९०० व्या शतकात खास मांस उत्पादनासाठी विकसित केली गेली. या जातीच्या शेळ्या विशेषकरून मांस (chevon) उत्पादनासाठी वापरल्या जातात.

टीम अॅग्रोवन

आफ्रिकन बोअर (African boer) या जातीची शेळी दक्षिण आफ्रिकेत १९०० व्या शतकात खास मांस उत्पादनासाठी विकसित केली गेली. या जातीच्या शेळ्या विशेषकरून मांस (chevon) उत्पादनासाठी वापरल्या जातात. या जातीचे मातृत्व कौशल्य इतर शेळ्यांच्या तुलनेत अधिक असते. ही शेळी उष्ण कटीबंधीय प्रदेशापासून थंड प्रदेशातील हवामानाशी जुळवून घेण्यास सक्षम आहे.

हेही पाहा - बोअर शेळी संगोपनाकडे वाढता कल

बोअर शेळीची वैशिष्ट्ये -    या जातीच्या शेळ्यांचे शरीर पांढरे मात्र डोके लाल असते. -    शेळ्यांचे कान लांब असून ते लटकल्यासारखे भासतात. -    या शेळ्यांची शिंगे जाड असून मागे वक्र होत गेलेली असतात. -    डोळ्यांचा रंग तपकिरी असतो. -    पूर्ण वाढ झालेल्या शेळ्यांचे वजन ४५ किलोपेक्षा अधिक असते, नराचे वजन ७० किलोहून अधिक असते. -    या जातीच्या शेळ्यांच्या वजन वाढीचा दर १५० ते १७० ग्रॅॅम प्रती दिवस असतो. -    नरांचा उपयोग प्रजननासाठी किंवा मांसासाठी तर मादीचा उपयोग प्रजजनासाठी केला जातो. -    यांचा फक्त वाढीचा दर जास्त नाही तर त्यांच्या प्रजननाचा दर देखील जास्त आहे. -    बोअर यांचे सरासरी आयुष्य आठ ते बारा वर्षे असते. नवीन शेळीपालनाचा व्यवसाय करू इच्छिणारे तरुण उद्योजक बोअर शेळीकडे जास्त प्रमाणात वळताना दिसू लागलेत. पण शेळीपालन व्यवसाय (goat farming) सुरु करताना तो स्थानिक जातीच्या (local breed) शेळ्यापासून केल्यास जुळवून घेणे सोयीचे जाते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT