Electricity Agrowon
ॲग्रो गाईड

अघोषित भारनियमनाचा शेतकऱ्यांना फटका

ऐन उन्हाळ्यात नियोजन खोळंबले; वीजनिर्मितीसाठी कोयनेतून अतिरिक्त पाणी वापरास परवानगी

Raj Chougule

कोल्हापूर : महावितरणने (MSDEL) सुरू केलेल्या अघोषित (फोर्स) भारनियमनाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. महावितरणकडून कृषिपंपाना वेळापत्रकानुसार वीज दिली जाते त्या मध्येही कधीही कपात केली जात आहे. प्रचंड उन्हाच्या (Summer) तडाख्यात शेतीला (Farm) पाणी देणे अशक्य झाल्याने पिके माना टाकत असल्याची परिस्थिती राज्यभरातील शिवारात आहे. ज्या भागात रात्री वीजपुरवठा केला जातो त्या भागात शेतकऱ्यांना तासन् तास विजेची वाट बघण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे संतापजनक चित्र आहे.
वीज कधी येणार, किती तास भारनियमन होणार याची कोणतीच माहिती स्थानिक पातळीवरील महावितरण कार्यालयांना नसल्याने शेतकऱ्यांची (Farmer) कुचंबणा होत आहे. महावितरणने भारनियमन होण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने ऐन उन्हाळ्यात शेतीला (Summer Farm) पाणीपुरवठा अशक्य बनण्याची शक्यता आहे. उसासह भाजीपाला पिकांना पाण्याची मोठी गरज लागत आहे. दिलेल्या विजेतही (Electricity) दोन-तीन तास कपात होत असल्याने संपूर्ण क्षेत्राला पाणी देणे अशक्य बनत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

इतर राज्यांमध्येही शेती पंपासाठी
भारनियमन महावितरणचा दावा

राज्यात शेतीपंपांची वीज (Electricity) कधीही कपात केली जात आहे. अशीच परिस्थिती गुजरात व आंध्र प्रदेशमध्येही असल्याचा दावा महावितरणच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत राज्यातील विजेची मागणी कमी होत नाही तोपर्यंत कृषिपंपांच्या विजेचे भारनियनम सुरूच राहील. फक्त शेतीसाठी (Farm) प्राधान्याने वीजपुरवठा करण्याबाबतचे विशेष धोरण अद्याप तरी नसल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे वीज पुरवठ्यातील अडथळे कायम राहील, अशी शक्यता आहे.

तीन हजार मेगावॉटची तूट (Deficit of three thousand megawatts)
महावितरणच्या म्हणण्यानुसार, विजेची वाढती मागणी व कोळश्याअभावी अपुऱ्या वीजनिर्मितीमुळे सुमारे २५०० ते ३००० मेगावॉट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार आहे. गेल्या फेब्रुवारीपासून उष्णतेच्या लाटेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचा वीजवापर (Power consumption of agricultural pumps along with industrial production) देखील वाढला आहे. राज्यात २८,००० मेगावॉटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी सध्या कायम आहे. मुंबई वगळता महावितरणच्या (MSDEL) कार्यक्षेत्रात सद्यःस्थितीत मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत तब्बल ४००० मेगावॉटने वाढ झालेली आहे. गेल्या पंधरवड्यापासून महावितरणची विजेची मागणी तब्बल २४५०० ते २४८०० मेगावॉटवर पोहोचली आहे.

महावितरणची (MSDEL) एकूण विजेची करारी क्षमता ३७,९०० मेगावॉट आहे. त्यापैकी स्थापित क्षमता ३३७०० मेगावॉट इतकी असून, त्यापैकी एकूण २१०५७ मेगावॉट (६२%) औष्णिक विद्युत क्षमता आहे. देशभरात कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या करारीत औष्णिक वीजनिर्मितीत (Electricity) देखील घट झालेली आहे. तसेच काही औष्णिक संच देखभाल व दुरुस्तीसाठी बंद असल्याने महावितरणला सध्या औष्णिक वीजनिर्मितीकडून तब्बल ६००० मेगावॉटने कमी वीज उपलब्ध होत आहे.

वीजनिर्मितीसाठी कोयनेतून
अतिरिक्त पाणी वापरण्यास परवानगी
कोयना जलविद्युत प्रकल्पातून (Koyna Hydroelectric Project) सध्या १८०० मेगावॉट विजेची निर्मिती सुरू आहे. येत्या ३१ मेपर्यंत जलविद्युत प्रकल्पांसाठी एकूण निर्धारितपैकी आता १७.६० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एरवी वीजनिर्मितीसाठी दररोज ०.३० टीएमसी पाणीवापर होत असताना विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या तब्बल ०.७० टीएमसी पाणीवापर सुरू आहे. पाणी वापरावर मर्यादा असल्याने व सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता वीजनिर्मितीसाठी आणखी १० टीएमसी (TMC Water Stores) पाणीसाठा वापरण्यास जलसंपदा (Water Resources) विभागाने विशेष मंजुरी दिली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाकडून वीजनिर्मितीमधील पाण्याची मर्यादा वाढल्याने वीजटंचाईपासून काहीसा दिलासा मिळणार असल्याचे महावितरणच्या (MSDEL) सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, काकडीला मागणी, चिकू महागला; बाजरीचे दर स्थिर, तुरीचे दर दबावात

Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

Crop Loan : खरिपासाठी ११७९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप

Irrigation Subsidy : ठिबक अनुदानाबाबत संभ्रम

Farmer Foreign Tour : राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्याची संधी

SCROLL FOR NEXT