Turmeric Management
Turmeric Management Agrowon
ॲग्रो गाईड

Turmeric : शेतकरी नियोजन पीक ः हळद

टीम ॲग्रोवन

सातारा जिल्ह्यातील गोवे येथील सचिन विठ्ठल गोरे यांची ३ एकर शेती आहे. त्यापैकी ३० गुंठे क्षेत्रावर हळद लागवड (Turmeric Cultivation), तर उर्वरित क्षेत्रामध्ये ऊस, वांगी आणि चारा पिकांची लागवड (Fodder Crop Cultivation) केली जाते. यासह ९ खिलार गायींचे ते संगोपन (Khilar Cow Rearing) करतात. संपूर्णपणे सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्यावर त्यांचा भर असतो. त्या अनुषंगाने एकाच क्षेत्रात एकच पीक सतत न घेता, पिकांची फेरपालट करण्यावर भर दिला जातो.

संपूर्ण सेंद्रिय शेतीचा श्रीगणेशा ः

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीन सुपीकता आणि मानवी आरोग्यास होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांनी रासायनिक खतांचा शेतीमध्ये वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सचिनराव यांनी घेतला. मागील १० वर्षांपासून त्यांनी सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर देत सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. जमीन सुपीकतेसाठी त्यांनी जिवामृत, घन जिवामृत, गोकृपा अमृत, वेस्ट डीकंपोझर आणि पाचट आच्छादनावर भर दिला आहे. पीक व्यवस्थापनात गोमूत्र, जिवामृत आणि दशपर्णी अर्काचा जास्तीत जास्त वापर केला जातो. २०१३ पासून त्यांनी सेंद्रिय पद्धतीने हळद लागवडीस सुरुवात केली.

हळद लागवड ः

- दरवर्षी साधारण ३० गुंठे क्षेत्रावर सेलम वाणाच्या हळदीची लागवड करतात.

- ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची चांगली मशागत केली. मशागतीनंतर शेत उन्हामध्ये चांगले तापू दिले. जेणेकरून कीड-रोगांच्या सुप्त अवस्था नष्ट होतील.

- त्यानंतर शेतामध्ये चांगले कुजलेले शेणखत ४ ट्रॉलीप्रमाणे पसरले जाते. शेणखत लवकर कुजण्यासाठी त्यावर वेस्ट डीकंपोजर वापरले जाते. शेणखत चांगले कुजल्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव टाळला जातो.

- लागवडीसाठी पेरणी यंत्राचा वापर केला जातो. या यंत्राद्वारे एकाच वेळी चार फुटांचे गादीवाफे तयार करून हळद बेणे पेरले जाते. गादीवाफ्यावर दोन ओळींत एक फूट व दोन गड्ड्यांत दीड फूट अंतर ठेवून झिगझॅग पद्धतीने पेरणी केली जाते.

- दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळद लागवड केली जाते. ३० गुंठे क्षेत्रावर लागवडीसाठी सहा ते सात क्विंटल हळद बेणे लागले.

- सिंचनासाठी पाटपाणी पद्धतीचा वापर केला जातो.

- हळद लागवडीमध्ये फरसबी, चवळी, मूग, मिरची व उडीद इत्यादी पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केली.

- तसेच शेतात पक्षिथांबे म्हणून मका पिकाची लागवड केली जाते. या पिकांवर बसणारे पक्षी किडींच्या जमिनीतील विविध अवस्था टिपून त्यांचे नैसर्गिक नियंत्रण करतात.

आगामी नियोजन ः

- बेलफळापासून बिल्व रसायन तयार केले जाते. त्याची नोव्हेंबर महिन्यात पिकावर गरजेनुसार फवारणी केली जाईल. त्यामुळे हळद गड्ड्यांचा आकार वाढण्यास मदत होते.

- सप्टेंबर ते नोव्हेबर या काळात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी जिवामृताची फवारणी केली जाईल.

काढणी ः

- लागवडीनंतर साधारण ९ महिन्यांनी मजुरांच्या मदतीने हळद काढली जाते.

- हळद काढणीनंतर बॉयलर व कुकरद्वारे योग्य पद्धतीने शिजवून शेतामध्येच सुकवली जाते. त्यानंतर पॉलिश करून साठवून ठेवली जाते.

- तीस गुंठे क्षेत्रातून साधारणपणे १२ ते १४ क्विंटल हळद उत्पादन मिळते. त्यापैकी ५० टक्के हळद पावडरची विक्री केली जाते.

विक्री नियोजन ः

सेंद्रिय हळदीला ग्राहक वर्गाकडून चांगली मागणी असते. ग्राहकांच्या मागणीनुसार हळद पावडर करून विक्री केली जाते. साधारणपणे २५० ग्रॅम, अर्धा किलो, एक किलो या प्रमाणे हळदीचे पॅकिंग केले

जाते. प्रतिकिलो ४०० रुपये दराने हळद विक्री होते. सेंद्रिय हळदीची ‘ज्ञानेश्‍वरी ब्रॅण्ड’ने विक्री होते. तसेच थेट विक्रीतूनही चांगला दर मिळत असल्याचे सचिनराव सांगतात.

- सचिन गोरे, ९७६३२३९५५०

(शब्दांकन ः विकास जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT