Jowar Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Rabi Jowar : रब्बी हंगामासाठी ज्वारीचे वाण

खरिपाच्या तुलनेमध्ये रब्बी ज्वारीचे उत्पादन कमी येण्याचे मुख्य कारण म्हणजे रब्बीसाठी उपलब्ध असलेल्या संकरित आणि शुद्ध वाणांची संख्या तुलनेने कमी आहे.

टीम ॲग्रोवन

पीकेव्ही क्रांती (एकेएसव्ही १३ आर) :

‘मालदांडी-३५-१’ (Maldandi-35-1) ला पर्याय म्हणून पीकेव्ही क्रांती (PKV Revolution)(एकेएसव्ही १३ आर) (AKSV 13R) हा रब्बी हंगामात (Rabi Season Production) अधिक उत्पादन देणारा, सरळ व शुद्ध वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola) येथे विकसित करण्यात आला आहे. त्याची संपूर्ण राज्यासाठी शिफारस असून, २००४-०५ पासून प्रसारित केला जातो. मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या या वाणाचे कणीस आकाराने मोठे, दाणे मोत्यासारखे चमकदार, ठोकळ आहेत. मध्यम ते भारी जमिनीकरिता उपयुक्त आहे. याच्या भाकरीची प्रत उत्तम असून, अन्य गुणामध्येही मालदांडी-३५-१ च्या तोडीस तोड आहे.

पीकेव्ही क्रांती या वानांची ठळक वैशिष्ट्ये :

-रब्बी ज्वारीच्या अन्य सुधारित वाणांपेक्षा अधिक उत्पादनक्षम व आनुवंशिकदृष्ट्या वेगळा वाण.

-मध्यम ते भारी जमिनीकरिता, कोरडवाहू आणि बागायती पेरणीसाठी उपयुक्त.

-धान्याचे सरासरी हेक्टरी उत्पादन २५-३० क्विंटल, कडब्याचे उत्पादन ७०-७५ क्विंटल.

-मध्यम कालावधी. १२०-१२२ दिवसांत परिपक्व.

-दाणे ठोकळ व मोत्यासारखेच चमकदार.

-भाकरीची प्रत आणि चव उत्तम.

-खोडकिडा, खोडमाशी व कडा करपा यांना बऱ्याच प्रमाणात प्रतिकारक.

- बीजोत्पादनाकरिता सोपे व दरवर्षी आपल्या शेतातील बियाणे वापरणे शक्य.

-मळणीस सुलभ.

फुले रेवती :

हा वाण बागायती क्षेत्रासाठी प्रसारित केला आहे. त्याच्या भाकरीची प्रत उत्तम आहे. सरासरी धान्य उत्पादन ४० क्विंटल प्रति हेक्टर, तर कडबा उत्पादन ११५ क्विंटल प्रति हेक्टरी आहे. कोरडवाहूमध्ये मध्यम जमिनीत लागवडीस योग्य आहे. वाण परिपक्व होण्याचा कालावधी ११२ ते ११८ दिवस आहे. धान्य उत्पादन २४ ते २५ क्विंटल प्रति हेक्टर, तर कडबा उत्पादन ६० ते ६५ क्विंटल प्रति हेक्टर आहे.

फुले वसुधा :

हा वाण भारी जमिनी, कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी उत्तम आहे. वाण परिपक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२० दिवस आहे. या वाणाचे हेक्टरी धान्य कोरडवाहू परिस्थितीमध्ये २५ ते २८ क्विंटल, तर ओलीताखाली ३० ते ३५ क्विंटल आहे. हेक्टरी कडबा उत्पादन कोरडवाहूमध्ये ५५ ते ६० क्विंटल, तर ओलीताखाली ७० ते ७५ क्विंटल येते.

हुरड्याचा नवीन वाण :

‘टी.ऐ.के.पी.एस.५’ (ट्रॉम्बे अकोला सुरूची) हा रब्बी ज्वारीचा खास हुरड्यासाठी नवीन वाण नुकताच प्रसारित झाला आहे. मळणीस सुलभ अशा या ज्वारीच्या हुरडा अत्यंत चविष्ट आहे. याचे हुरड्याचे हेक्टरी उत्पादन ४३ क्विंटल असून, हिरव्या चाऱ्याचे उत्पादन हेक्टरी ११० क्विंटल मिळते.

रब्बी ज्वारीच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे मुद्दे :

- सुधारित व संकरित वाणांचा वापर करावा.

- पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑॅक्टोबरपर्यंत करावी. ओलिताखालील ज्वारीची ३० ऑक्टोबरपर्यंत पेरणी करता येते.

- शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांचा वापर करावा.

- हेक्टरी ७ ते १० किलो बियाणे वापरावे.

-पेरणीपूर्वी प्रति किलो ४ ग्रॅम गंधकाची बीजप्रक्रिया करावी.

-पेरणी तिफणीने दोन चाड्याच्या पाभरीने ४५ बाय १५ सें.मी. अंतरावर करावी.

- मध्यम ते भारी जमिनीत प्रति हेक्टरी १५० लाख ताटांची संख्या ठेवावी.

- संरक्षित पाणी देणे शक्य असल्यास जमिनीचा मगदूर आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

-खरिपात मूग/उडीद/भुईमूग/सोयाबीन अशी पिके घेतलेली असल्यास, रब्बीमध्ये ज्वारी पेरणी फायदेशीर ठरते.

- आंतरमशागत आणि रोगकिडींचे वेळेवर नियंत्रण करावे.

डॉ. गोपाल ठाकरे, ९४२२९३९०६५

(सहा. प्राध्यापक, ज्वारी संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT