Pig Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Pig Farming : वाढती मागणी, निर्यातीसाठी शेतीला जोड द्या वराहपालनाची

Piggery : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे वराहपालन. बाजारपेठेतील वाढती मागणी, निर्यातीतील संधी आणि वराहाच्या मांसाची पौष्टिकता लक्षात घेतली तर अनेक लोक या व्यवसायाकडे वळत आहेत.

Team Agrowon

Animal Care : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे वराहपालन. बाजारपेठेतील वाढती मागणी, निर्यातीतील संधी आणि वराहाच्या मांसाची पौष्टिकता लक्षात घेतली तर अनेक लोक या व्यवसायाकडे वळत आहेत.

वराहपालन हे प्रामुख्याने मांस म्हणजेच पोर्क उत्पादनासाठी केलं जातं. मोठे रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये पोर्क आणि बेकन खाद्यपदार्थांना चांगली मागणी असते. वराहाच मांस सौंदर्य प्रसाधन तयार करण्यासाठी आणि संशोधनासाठीही वापरल जात. याशिवाय पोर्कची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते. आपल्याकडे गोवा, पंजाब आणि पूर्वेकडील राज्यात वराहाच्या मांसाला जास्त मागणी आहे. वराहाचे शरीरविज्ञान मानवी शरीर क्रियेप्रमाणेच काम करते. त्यामुळे अल्कोहोल आणि इतर औषधांचा मानवामध्ये वापर करण्यापूर्वी वराहावर होणाऱ्या वाईट परिणामांचा अभ्यास केला जातो. वराहाचे मूत्रपिंड, हृदय आणि यकृत मानवामध्ये प्रत्यारोपित केले जाऊ शकते.

मानवाच्या खराब झालेल्या त्वचेवर वराहाची त्वचा प्रत्यारोपित केली जाते. त्यामुळे वराहाच्या कातडीलासुद्धा चांगली मागणी आहे.मांसाच जास्त उत्पादन घेण्यासाठी मादी वराहांनी गाभण राहून जास्तीत जास्त पिल्लांना जन्म दिला पाहिजे. विशेष म्हणजे मादी वराहाचा गाभण काळ हा फक्त ११४ दिवसांचा असतो. म्हणजे वराह १५ महिन्यातून ३ वेळा पिल्लांना जन्म देऊ शकतात. एका वेळी जन्माला येणाऱ्या पिल्लांची संख्या ६ ते १२ इतकी असू शकते. योग्य काळजी घेतली तर या पिलांच वजनही झपाट्यान वाढत. वराह हे अखाद्य तसेच हॉटेल मधील टाकाऊ खाद्य पदार्थावर जगू शकतात.वराहाची विष्ठा शेतात खत म्हणून वापरता येते.


वराहपालन जर सुरु करायचे असेल तर फार्मचा आकार आणि वराह संगोपनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यामध्ये वराहाच्या सुधारित संकरित जातींची निवड आणि संतुलित आहाराच्या नियोजनाला महत्व आहे.'L

वराह फार्म कसे तयार करावे

फायदेशीर व्यवसायासाठी वराह फार्म यार्ड, औषधोपचार, जंतनिर्मूलन आणि वराहांचे लसीकरण या बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते.वराहपालनासाठी शेड बनवताना जमीन खडबडीत असावी. शेडचे आकारमान ३ मीटर बाय २.४ मीटर किंवा ३ मीटर बाय ३ मीटर असे सम आकाराचे किंवा थोडे मोठे असावे. शेडच्या आजूबाजूला झाडे लावावीत.वराहांना घाम येणाऱ्या ग्रंथी कमी असतात. त्यामुळे उन्हाळ्यात आणि प्रजनन काळात वराहांना फिरण्यासाठी चिखलाची गरज असते. त्यासाठी शेडजवळ कृत्रिम चिखलाचा डोह तयार करावा. त्याला योग्य नाली ठेवावी. चिखलाच्या खड्ड्याचा साधारण आकार आणि संख्या वराहांच्या आकाराप्रमाणे ठेवावी.

वराहाचे खाद्य व्यवस्थापन

वराहांसाठी खाद्य म्हणून सर्वात स्‍वस्‍त घटकांची निवड करावी, कारण ७० टक्के खर्च हा आहारावर होतो. यामध्ये मका, चारा, बाजरी, गहू आणि तांदूळ हे चांगल्या प्रतीचे घ्यावे. सर्व धान्ये ही दळलेली असावीत. सरकी पेंड, ब्लड मील, फिश मिल, बोन मिल चांगल्या गुणवत्तेचे वापरावे.आहारात हिरव्या शेंग भाज्यांचा समावेश करावा. यामुळे अतिरिक्त जीवनसत्त्व अ देण्याची गरज भासत नाही.लगद्याच्या स्वरुपातील ओल्या अन्नापेक्षा कोरडे, कोंडा मिश्रित खाद्य जास्त सोयिस्कर असते. जर खाद्य जास्त तंतूयुक्त असेल तर खाण्याचे प्रमाण वाढते, वजनात वाढ होते. संतुलित आहाराने अन्न वाया जाण्याचे प्रमाणही कमी होते. वाढत्या वयातील पिलांना जास्त खायला घालू नये. तरुण वराहाचे वजन ३५ ते ४० किलो आणि पूर्ण वाढ झालेल्या वराहाचे वय ५५ ते ६० किलो प्रजनन ते वाढीपर्यंत असावे. अशा प्रकारे वराहाच्या योग्य जातींची निवड, खाद्य आणि शेडचे योग्य व्यवस्थापन ठेवले तर कमी खर्चात कमी भांडवलात फायदेशीर वराहपालन करता येते.

माहिती आणि संशोधन - मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT