Team Agrowon
लसूण पीक तापमानास अत्यंत संवेदनशील असून दर्जेदार उत्पादनासाठी शिफारस केलेल्या हंगामामध्येच लागवड करावी.
लसणाचा कंद जमिनीत पोसत असल्याने वाढीकरिता पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली भुसभुशीत व कसदार जमीन लागते.
लसणाचे कंद जमिनीत पोसतात. लसणाची मुळे १५ ते २० सेंमी खोलीपर्यंत जात असल्याने ३० ते ४० सेंमी खोलीपर्यंत जमीन चांगली भुसभुशीत असणे आवश्यक आहे.
लागवडीसाठी फुले नीलिमा, फुले बसवंत, गोदावरी, श्वेता तसेच यमुना सफेद, ॲग्रीफाऊंड व्हाइट, भीमा ओंकार या जातींची निवड करावी.
लागवडीसाठी हेक्टरी ६०० किलो बेणे पुरेसे होते. लागवडीसाठी सुधारित जातीचे बेणे वापरावे.
लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्यांवर कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रक्रिया करावी. लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या द्रावणात दोन तास बुडवून मग लागवड करावी.
रब्बी हंगामामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात लागवड करावी. उशिरा लागवड केल्यास लसणाच्या कंदाचा आकार कमी होतो, वजन कमी भरते. परिणामी उत्पादनात घट होते.