Wild Vegetable
Wild Vegetable Agrowon
ॲग्रो गाईड

काटे माठ, निळी फुलीची विषबाधा

टीम ॲग्रोवन

डॉ. नितीन जाधव, डॉ. शाहीर गायकवाड

काटे माठ (Kathe Math) ही वनस्पती मराठवाडयातील बऱ्याच भागात आढळते. या वनस्पतीमध्ये नायट्रेटचे (Nitrate) प्रमाण सर्वात जास्त असते. कमी पावसाच्या भागामध्ये जेव्हा सुरवतीचे दोन ते तीन पाऊस पडतात तेव्हा जमिनीमध्ये असणारे जास्तीत जास्त नायट्रोजन या वनस्पतीमध्ये नायट्रेट स्वरूपात साठवले जाते. ही वनस्पती जनावरांनी खाल्ल्यानंतर वनस्पतीमध्ये असणारे नायट्रेटचे रूपांतर नायट्राईटमध्ये होते. त्यानंतर नायट्राइटचे रूपांतर अमोनियामध्ये होते. (Wild Vegetable)

नायट्राइटचा आरोग्यावर परिणाम ः

१) सर्वसाधरणपणे अमोनिया हे शरीरातील प्रथिने तयार करण्यासाठी मदत करते. नायट्रेटचे रूपांतर नायट्राइटमध्ये जास्त प्रमाणात होते. नायट्राइट शरीरामध्ये जास्त प्रमाणात साठल्यास शरीरास घातक ठरते. नायट्राइटमुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे रूपांतर मीथ-हिमोग्लोबिनमध्ये होते. त्यामुळे शरीरातील महत्वाच्या अवयवांना ऑक्सिजन पोहोचू शकत नाही. यामुळे जनावर दगावण्याची शक्यता वाढते.

विषबाधेची लक्षणे ः

२) जनावरांना धाप लागते, शरीर थरथरते, श्‍वास घेण्यास त्रास होतो, जनावर जागेवर कोसळते, तोंडावाटे श्‍वास घेते, यासारखी लक्षणे दिसतात. जनावरांचा काही तासात मृत्यू होतो.

उपाययोजना ः

१) बिषबाधेची लक्षणे आढळून आल्यास त्वरित पशुतज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. वेळेत उपचार केल्यास विषबाधा कमी होते.

२) विषबाधा टाळण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला शेती बांधावर असलेली माठ वनस्पती जनावरांच्या आहारात येऊ देऊ नये. शक्यतो अशा ठिकाणी चरण्यास प्रतिबंध करावा.

निळी फुलीची विषबाधा

१) ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीमध्ये ऑग्झलेटचे प्रमाण जास्त असते. ऑग्झलेट हे शरीरात खाद्याद्वारे गेल्यानंतर रक्तातील घटकात मिश्रित होउन ते कॅल्शिअम सोबत एक घटक बनवतात. त्यामुळे शरीरातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण कमी होते. ऑग्झलेट आणि कॅल्शिअम एकत्र झाल्यास काचेसारखा अपायकारक घटक तयार होतो. काचेसारखा तयार झालेला घटक हा इतर अवयवांना अपयकारक ठरतो. काही प्रमाणात हा घटक पोटामध्ये विघटित होऊन कार्बोनेट व बायकार्बोनेट तयार होते. त्यामुळे पोटफुगी होऊ शकते.

२) शरीरातील कॅल्शिअम व मॅग्नेशिअम कमी झाल्यामुळे याचा परिणाम हदयावर होतो. हदयाचे ठोके अनियमित होतात. शरीरातील कॅल्शिअम व मॅग्नेशिअमची मात्रा कमी झाल्यामुळे दूध उत्पादन कमी होते. जनावारांची हाडे ठिसूळ होतात. ऑग्झलेट आणि कॅल्शिअम यांचा काचेसारखा घटक जेव्हा किडनीमध्ये जातो तेव्हा किडनीवर परिणाम होऊन किडनीचे कार्य व्यवस्थित होत नाही. किडनी बंद होण्याची शक्यता असते.

लक्षणे ः

१) विषबाधेमुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होणे, भूक लागत नाही, अशक्तपणा येतो, जनावर जागेवरच कोसळते.

२) किडनीवर परिणाम झाल्यामुळे लघवी न येणे किंवा लघवीद्वारे रक्त येणे अशी लक्षणे दिसतात.

उपाययोजना ः

१) जनावरांमध्ये विषबाधेची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.

-----------------------------------------------------------------------

संपर्क ः डॉ. नितीन जाधव, ९९०६९००८२०

(सहायक प्राध्यापक, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT