महेश लोंढे
सध्या जगभरात भरड धान्याची मागणी (Millet Demand) वाढत आहे. या धान्यांच्या आरोग्यदायी गुणधर्माविषयी विविध स्तरांतून जनजागृती होत आहे. राळे सावा, सामा, भगर, कोडो यांची खाद्य पदार्थ आणि प्रक्रियेसाठी (Food Processing) मागणी वाढत आहे. भरड धान्यांवर शेतकरी, शेतकरी उत्पादक आणि महिला बचत गट, उद्योजक प्रक्रिया करू शकतात. अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये हा प्राथमिक प्रक्रियेचा व्यवसाय (Food Processing Industry) उभारणे शक्य आहे.
प्राथमिक प्रक्रियेतील आव्हाने
ही धान्ये आकाराने लहान आहेत.
वेगवेगळ्या आकारामध्ये कच्च्या मालाची उपलब्धता.
प्रक्रिया केलेल्या भरडधान्यामध्ये लवकर सोंडे होतात.
टरफल काढलेल्या लहान भरडधान्यांची कमी टिकवणक्षमता.
लहान भरडधान्याची प्राथमिक प्रक्रिया
लहान भरडधान्यावरील टरफल काढणे ही प्रक्रिया आहे. टरफलाचा भाग खाण्यायोग्य नसून त्याच्या आतील भाग खाण्यायोग्य आहे.
लहान भरडधान्यामध्ये राळ, कोडो, वरई, सामा, सावा, भगर यांचा समावेश होतो. या धान्यांची टरफले जाड असल्याने भरडण्यासाठी वेळ आणि मजूर जास्त लागतात.
पारंपरिक पद्धतीने जात्यावर किंवा उखळाचा वापर करून टरफले काढली जातात. परंतु हे काम जास्त कष्टाचे व वेळखाऊ असल्याने काही वर्षांपासून लहान भरडधान्याची लागवड कमी झाली.
माती, खडे काढण्याचे यंत्र
यंत्राच्या माध्यमातून लहान खडे, गवत, भुस्कट इत्यादी धान्यांपासून वेगळे करता येते. ही प्रक्रिया पीक काढणीनंतर लगेच करावी, जेणेकरून पुढील प्रक्रिया करण्यास जास्त मदत होते.
या यंत्रामध्ये सर्व प्रकारच्या भरडधान्यांची स्वच्छता करता येते.
एकदल भरडधान्याचे टरफल काढण्याचे यंत्र
यंत्रामधून लहान भरडधान्याचे टरफल काढले जाते. या सर्व प्रक्रियेतील टरफल काढणे ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे.
यामध्ये दोन प्रकारची यंत्रे आहेत. धान्यावरील टरफल कमीत कमी काढून यातील तंतूमय घटक मोठ्या प्रमाणावर ठेवता येतात.
द्विदल भरडधान्याचे टरफल काढण्याचे यंत्र
काही लहान भरडधान्यांचे टरफल हे सात थरांचे असते. त्यासाठी यंत्राची आवश्यकता असते.
भगर, कोडो धान्याचे टरफल काढण्यासाठी दोन वेळा प्रक्रिया करावी लागते.
प्रतवारी करण्याचे यंत्र
या यंत्रामधून शेवटी प्रक्रिया केली जाते, कारण या यंत्रामधून छोटे खडे काढले जातात, प्रतवारी केली जाते. त्यानुसार लहान भरडधान्याचे दर ठरतात.
पॉलिश करणारे यंत्र
या यंत्राचा वापर मोठे प्रक्रिया उद्योजक करतात. आपण बाजारातून वरई, भगर आणतो ती यंत्रामधून पॉलिश करून दिली जाते. परंतु अशी भगर खाणे टाळावे, कारण यामधील तंतुमय घटक निघून गेलेले असतात. त्यामुळे शक्यतो अनपॉलिश भरडधान्ये खावीत. आपल्याकडे भगर फक्त उपवासाला खाल्ली जाते. तसे न करता भगर वर्षभर आहारात असावी.
लहान भरडधान्याचा दैनंदिन आहारामध्ये समावेश करून मधुमेह, कुपोषणावर मात करू शकतो.
लहान भरडधान्यांची बाजारातील उपलब्धता आणि प्रक्रियेसाठी लागणाऱ्या यंत्रांची कमतरता आहे. संशोधन संस्थांनी लहान भरडधान्याच्या प्रक्रियेसाठी यंत्रांची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेणेकरून लहान भरडधान्यापासून उपपदार्थ निर्मितीला चालना मिळेल.
प्रतवारी यंत्रणा
धान्यामधील अनावश्यक गोष्टी काढल्यानंतर प्रतवारी करावी लागते. यामुळे लहान आणि मोठे धान्य वेगळे करता येते. मोठे धान्य लागवडीसाठी वापरू शकतो. यातील अगदी लहान धान्य जनावरांच्या खाद्यात वापरता येते.
गरजेनुसार धान्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करता येतात. याला दर देखील चांगला मिळतो.
यंत्रामुळे टरफल असलेले धान्य आणि टरफल नसलेले धान्य वेगवेगळे होते.
लहान भरडधान्यावर प्रक्रियेसाठी लागणारे यंत्र आणि जागा
प्रक्रियेसाठी गरज महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट लहान उद्योजक मोठे उद्योजक
क्षमता ५० किलो प्रति तास १०० किलो प्रति तास ५०० ते १००० किलो प्रति तास
मनुष्यबळ २ मजूर २ ते १० मजूर, प्रक्रियेवर अवलंबून १५ ते ३० मजूर
जागेची गरज दोनशे चौरस फूट १२०० चौरस फूट, गोदाम क्षमता २ ते ४ टन ५,००० ते १०,००० चौरस फूट
गोदाम क्षमता १० ते १२ टन, गाड्यांसाठी जागा, ऑफिससाठी जागा.
साधनसामग्री लहान भरडधान्यांची उपलब्धतेनुसार कोणत्या लहान भरडधान्यावर प्रक्रिया करता यावर अवलंबून ५,००० ते १०,००० चौरस फूट, गोदामक्षमता १० ते १२ टन, गाड्यांसाठी जागा, ऑफिससाठी जागा.
युनिट खर्च २.५ लाख रूपये ४ ते ५ लाख रूपये १० ते ३० लाख रूपये
विजेची गरज सिंगल फेज किंवा ३ फेज,
५ ते १० एचपी ३ फेज, १० ते १२ एचपी ३ फेज, ३० ते ५० एचपी
विशेष उपकरणे वजन काटा, बोल ब्लोअर वजन काटा, पॅकेजिंग यंत्रणा, गनी बॅग ब्लोअर विपणन वजन काटा, गाडी, वजन काटा, पॅकेजिंग साहित्य, ब्लोअर, ट्रॉली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.