Napier Grass Cultivation
Napier Grass Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Napier Grass Cultivation : उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची गरज भागविण्यासाठी कोणत्या गवताची लागवड कराल?

Team Agrowon

पशुपालनात चारा उत्पादन (Fodder Ptoduction) व व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग आहे. वर्षभर हिरव्या चाऱ्याची गरज भागवण्यासाठी चारा पिकांचं (Fodder Crop) नियोजन करून तशी उपलब्धता ठेवावी लागते.

नेपीयर गवत पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखलं जात होतं. नेपियर गवत (Napier Grass) हे बहुवार्षिक असल्यामुळे एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षांपर्यंत या चारा पिकापासून उत्पादन मीळत राहतं.

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता असते. या काळात जनावरांसाठी नेपियर गवत चांगला पर्याय आहे.  

नेपियर गवताला हत्ती गवत असंही म्हणतात. साधारण फेब्रुवारी - मार्च मध्ये या गवताची लागवड करता येते.  

नेपियर लागवडीसाठी एक खोल नांगरणी आणि २ ते ३ वेळा वखरणी करून जमीन तयार करावी.

लागवडीपूर्वी उभ्या-आडव्या नांगरटी करून, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.

नेपियर गवताची कांडी ४ फूट x २ फूट अंतरावर लावल्यास चारा उत्पादन मुबलक मिळते. ४ फुटाची सरी केल्यामुळे आंतरमशागती सोबतच चारापिकास पाणी देणे सोयीचे जाते.

उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांत या गवताची लागवड करावी. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी.

तीन महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात.

सरासरी दोन ठोंब्यांतील अंतर ९० x ६० सें. मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते.

लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार प्रतिहेक्‍टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश द्यावे. पुढे पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी कापणीनंतर २५ किलो नत्र द्यावं.

गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी करावी.

उन्हाळी हंगामात लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कापणी लागवडीपासून अडीच ते तीन महिन्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण १५ ते २० सें. मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सहा ते आठ आठवड्यांनी कराव्यात. 

वर्षभरातील सात ते आठ कापण्यांनंतर हेक्टरी २००० ते २५०० क्विंटल उत्पादन मिळतं.उष्ण कटिबंधातील वातावरण या पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त असते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT