Green Fodder : उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्यासाठी चवळीची लागवड कशी कराल?

Team Agrowon

चवळीच्या पेरणीकरिता हेक्टरी ४० - ४५ किलो भेसळ विरहीत न फुटलेले, टपोरे व शुध्द बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ‘रायझोबियम’ चोळावे.       

Green Fodder | Agrowon

बियाणे पेरणीपूर्वी हेक्टरी २० किलो नत्र म्हणजेच ४३ किलो युरिया व ४० किलो स्फुरद म्हणजेच २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून द्यावे.       

Green Fodder | Agrowon

पेरणीनंतर लगेच एक पाणी द्यावं. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी दुसरे आंबवणीचे पाणी दयावं. उन्हाळी हंगामात ७ ते ९ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.       

Green Fodder | Agrowon

पिकांच्या दोन ओळींमधील जमीन हातकोळप्याने कोळपून घ्यावी. बियाणे पेरणीनंतर २१ - २५ दिवसांनी एक खुरपणी करून पीक तणविरहीत ठेवाव.

Green Fodder | Agrowon

चवळीचे वेल उंच व दाट वाढत असल्याने पीक वाढीच्या काळात जमीन झाकली जाऊन तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. 

Green Fodder | Agrowon

चवळी हे द्विदल वर्गातील चारा पीक आहे. ज्यामध्ये प्रथिनांच प्रमाण १३ ते १५ टक्के असतं. चवळी पिकापासून उत्तम प्रतिचा रूचकर व पौष्टिक चारा मिळतो. 

Green Fodder | Agrowon
Orange Farming | Agrowon
आणखी पाहा...