fertilizer management in citrus fruit crop
fertilizer management in citrus fruit crop Agrowon
ॲग्रो गाईड

Santra Ambia Bahar : संत्रा बागेत आंबिया बहार घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

Team Agrowon

संत्रा-मोसंबी बागेपासून चांगले आर्थिक उत्पादन मिळण्यासाठी आंबिया बहाराची शास्त्रीय दृष्टीने निगा राखणे गरजेचे आहे.

आंबिया बहार धरलेल्या संत्रा बागांमध्ये ताण तोडल्यानंतर खत आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करताना हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यांत विभागून द्यावी.

जमिनीच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. याशिवाय काय काळजी घ्यावी? याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

तापमानात वाढ होताच हलके ओलीत करावे. ताण तोडताना हलक्या ओलिता अगोदर प्रत्येक झाडाला ६०० ग्रॅम नत्र + ४०० ग्रॅम स्फुरद + ४०० ग्रॅम पालाश आणि भरखते द्यावीत. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यानंतर २० ते २५ दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावा.

हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यांत विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.

ओलित व्यवस्थापन  

आंबिया बहाराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा साठा उपलब्ध असणे आवश्‍यक आहे.  

जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते. त्यामुळे आंबिया बहर घेताना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.  

ओलितासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. जमिनीच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 

वाफ्याला आच्छादित करणे  

वाफ्यातील ओलावा टिकविण्यासाठी ६ सेंमी जाडीचा गवताचा थर देऊन आच्छादित करावा. त्यामुळे ओलावा टिकून राहतो व फळांची गळ कमी होते. तसेच जमिनीतील जिवाणू सक्रिय होऊन अन्नद्रव्य मुळांना सहज उपलब्ध होते. 

संत्रा बहाराची निगा कशी राखावी?

बहार आल्यानंतर सर्वच फुलांचे फळात रूपांतर होत नाही. बहारामध्ये बरीच फुले नर फुले असतात. त्यामुळे ही नर फुले गळून पडतात. त्यामध्ये फलन क्रिया होत नाही.  

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, संजीवकांचा अभाव, हवामानाचा असमतोलपणा आणि किडींचा उपद्रव यामुळे फळांची गळ होते. 

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मॅगनिज सल्फेट आणि फेरस सल्फेट यांची २ ग्रॅम प्रति  लिटर पाण्यातून फवारणी करावी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT