Tomato Processing Agrowon
ॲग्रो गाईड

Tomato Processing : टोमॅटोपासून केचअप, लोणचे, पावडर कसे तयार कराल?

टोमॅटोपासून रस, केचअप, सॉस, लोणचे, ज्यूस, सूप, पावडर असे विविध पदार्थ तयार करता येतात. या पदार्थांना बाजारात चांगली मागणी असते.

Team Agrowon

एस. एन. चौधरी

Food Processing Industry : टोमॅटो ही नाशवंत फळभाजी असून जास्त काळ साठवून ठेवता येत नाहीत. बाजारात एकाच वेळी जास्त आवक झाल्यामुळे टोमॅटोला अपेक्षित दर मिळत नाहीत. परिणामी कवडीमोल दराने विक्री करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नाही.

साठवणुकी संदर्भातील अज्ञान, प्रक्रियेविषयी अनभिज्ञता, पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, तांत्रिक ज्ञानाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे प्रक्रिया करण्याला महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

त्यावर उपाय म्हणून टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करता येते. टोमॅटोपासून रस, केचअप (tomato ketchup), सॉस, लोणचे (Tomato pickle), ज्यूस, सूप, पावडर (tomato powder) असे विविध पदार्थ तयार करता येतात. या पदार्थांना बाजारात चांगली मागणी असते.

१) केचअप साहित्य ः

टोमॅटो पल्प १ किलो, व्हिनेगार ४० मिलि, लवंग, दालचिनी, काळीमिरी, जायफळ, , प्रत्येकी ६० ग्रॅम, कांदा आणि लसूण पावडर १० ग्रॅम, सायट्रिक ॲसिड ५ ग्रॅम, साखर १५० ग्रॅम, पेक्टिन ५ ग्रॅम.

कृती ः

कढईमध्ये टोमॅटोचा पल्प घेऊन मंद आचेवर उकळत ठेवावे. मिश्रण उकळताना सतत ढवळत राहावे, जेणेकरून करपू नये. त्यानंतर पातेल्यातील उकळत असलेला पल्प साधारण १ तृतीआंश भाग कमी झाल्यानंतर साखर टाकून चांगले ढवळावे.

२) लोणचे साहित्य ः

टोमॅटो काप १ किलो, मेथी ३० ग्रॅम, मोहरी डाळ ६० ग्रॅम, बडीशेप ५० ग्रॅम, दालचिनी १० ग्रॅम, काळीमिरी १० ग्रॅम, लवंग १० ग्रॅम, हिंग १० ग्रॅम, काश्मिरी लाल मिरची ५० ग्रॅम, तिखट लाल मिरची १५ ग्रॅम, मीठ १२० ग्रॅम, हळद ५ ग्रॅम, तेल ४०० ग्रॅम.

कृती ः

१) टोमॅटो वाफवून त्याचे जाडसर काप करावेत. हे काप ३ ते ४ तासांसाठी उन्हामध्ये किंवा ड्रायरमध्ये ५० अंश सेल्सिअस तापमानाला वाळवून घ्यावे. त्यामुळे टोमॅटो कापामधील पाण्याचे प्रमाण कमी होईल.

२) एका कढईत मोहरी पावडर, मेथी, बडीशेप, लवंग, दालचिनी, काळीमिरी वेगवेगळी भाजून त्याची जाड भरड बनवावी. दुसऱ्या कढईत मंद आचेवर तेल गरम करायला ठेवावे. तेल कोमट झाल्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, हिंग एकत्र करून चांगले भाजून घ्यावे.

भाजल्यानंतर त्यात तयार केलेली भरड मिसळून घ्यावी. एका पातेल्यात टोमॅटो काप आणि मीठ एकत्र करून त्यात तेल आणि वरील मसाल्यांचे मिश्रण मिसळून घ्यावे. हे लोणचे बरणीमध्ये मुरण्यास ठेवून द्यावे.

पावडर ः

टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावेत. टोमॅटो उकळत्या पाण्यात २ ते ३ मिनिटांसाठी उकळवून घ्यावे आणि त्वरित थंड पाणी ओतावे. नंतर टोमॅटोचे काप करून ट्रे ड्रायरमध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानाला १४ तासांसाठी ठेवून द्यावेत.

वाळलेल्या टोमॅटोची मिक्सरमधून फिरवून पावडर करावी. तयार पावडर चाळणीने चाळून घ्यावी. विविध पदार्थांना वेगळी चव आणि पदार्थ चटपटीत होण्यासाठी ही पावडर वापरता येते.

एस. एन. चौधरी, (के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease Vaccination: लम्पी प्रतिबंधासाठी ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप

Banana Price: बऱ्हाणपूर येथे केळीला कमाल २८०० रुपये दर

Ashwagandha Farmers Crisis: अश्वगंधावरील निर्बंधांमुळे शेतकरी अडचणीत

Rural Economy: सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत : मोहोळ

Modern Education: विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासह पायाभूत सुविधा देणे गरजेचे; उपमुख्यमंत्री पवार

SCROLL FOR NEXT