Agriculture Engineering
Agriculture Engineering Agrowon
ॲग्रो गाईड

Agriculture Engineering : कृषी अभियांत्रिकीमध्ये वाढत्या संधी

Team Agrowon

डॉ. एस. बी. पाटील, डॉ. जयंत घाटगे

Agriculture Engineering Update : विकसित शेतीमध्ये कृषी अभियांत्रिकी पदवीधराला चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रामध्ये विविध यंत्रे, पीक लागवडीपासून ते प्रक्रिया, पॅकिंगपासून ते मार्केटिंगपर्यंतचे सर्व टप्पे सामावले आहेत.

याचबरोबरीने सौरऊर्जा, पवनऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, पृथ्वी, जल व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकास, पाणी व्यवस्थापन, शेतवस्ती विकास, बायोगॅस, सेंद्रिय शेती, जनावरांचे संगोपन, शेती कुंपण आदी उद्योगामध्ये संधी आहेत.

कृषी अभियांत्रिकी पदवीनंतर आपल्या समोर पदव्युत्तर व आचार्य पदवी शिक्षणाची संधी मिळते. याशिवाय एमबीएसाठी संधी आहे. आयआयटी, आयआयपी, आयआयएमसारख्या ठिकाणी देखील पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन पदव्युत्तर होता येईल.

प्रवेशाचे स्वरूप

बारावीनंतर चार वर्षे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला बी.टेक. कृषी अभियांत्रिकी ही पदवी मिळू शकते. त्यासाठी सर्वसाधारण उमेदवाराला बारावीमध्ये ५० टक्के, तर आरक्षित वर्गासाठी किमान ४० टक्के गुण आवश्यक आहेत.

बारावी (PCM/PCMB & English) नंतर MHTCET/JEE/AIEEA-UG या पात्रता परीक्षेनंतर विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र होतो.

अभ्यासक्रमाचे स्वरूप

कृषी संलग्न सर्व शाखांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे १८३ क्रेडिट असणारी ही पदवी आहे. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर तसेच सायन्स आधारित सर्व गोष्टींचे पुरेपूर ज्ञान या पदवी अभ्यासक्रमात आहे.

महत्त्वाचे विभाग

- कृषी यंत्रे व शक्ती विभाग

- सिंचन व निचरा विभाग

- मृद् व जलसंधारण विभाग

- प्रक्रिया व अन्न विभाग

- अपारंपरिक ऊर्जा विभाग

करिअर संधी

शासकीय नोकरी : यूपीएससी (भारतीय वन सेवा) एमपीएससी परीक्षेतून (उदा. कृषी उपसंचालक, कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, वन क्षेत्रपाल, वन संरक्षक, कृषी सहायक, तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका/ नगर परिषद) सरकारी नोकरी..

केंद्रीय कृषी आस्थापना : भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये तांत्रिक अधिकारी ते शास्त्रज्ञ, विविध केंद्र व राज्य सरकारचे कृषी संशोधन केंद्र, एएसआरबी, एमसीएईआर, कृषी विद्यापीठात प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, तांत्रिक अधिकारी, कृषी सहायक, कृषी विज्ञान केंद्र, टेक्निकल ऑफिसर इत्यादी.

- सरकारी, निमसरकारी आणि सहकारी आस्थापना ः उदा. अमूल डेअरी फार्मसारखे उद्योग, विविध कृषी प्रक्रिया उद्योग, सहकारी साखर कारखाने, महाबीज, महामंडळ इत्यादी.

- बँक छ कृषी अधिकारी, प्रादेशिक ग्रामीण बँक

- विमा क्षेत्र : कृषी विमा कंपनीमध्ये संधी.

- सेंट्रल वेअर हाउसिंग कार्पोरेशन, भारतीय अन्न महामंडळामध्ये संधी.

- खते व कीटकनाशक उद्योग.

- बी-बियाणे उद्योग.

- ट्रॅक्टर आणि शेती अवजारे.

- अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये संधी.

- विविध कृषी संलग्न उद्योगातील संशोधन विभाग.

- सिंचन उद्योगामध्ये डिझाईइन इंजिनिअर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह.

- सौरऊर्जा, बायोगॅस उद्योग.

- पॉलिहाउस व शेडनेट उद्योग

- मृद् व जलसंधारण विभाग, पाणलोट क्षेत्रात कार्यरत संस्थांमध्ये संधी.

- शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक म्हणून संधी

- उद्योजक किंवा व्यावसायिक

- कृषी सेवा केंद्र

- प्रगतशील शेतकरी

- शेती मार्गदर्शक व सल्लागार

लेखक - डॉ. एस. बी. पाटील, ९८२३३८११९१, (डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे डॉ. एस. बी. पाटील हे प्राचार्य आणि डॉ. जयंत घाटगे हे सहयोगी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT