Agriculture Scheme Agrowon
ॲग्रो गाईड

कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा’

कृषी योजनांच्या लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी गावोगावी शिबिरे घ्यावीत

टीम ॲग्रोवन 

अमरावती : ‘‘शासनाने कृषी विभागाने Government by the Department of Agriculture) अनेक चांगल्या योजना अमलात आणल्या आहेत. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या योजना खेडोपाडी पोहोचणे आवश्यक आहे. कृषी योजनांच्या लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी गावोगावी शिबिरे घ्यावीत, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री (Minister for Women and Child Development) ॲड. यशोमती ठाकूर यांनी वरखेड येथे दिले.
तिवसा तालुक्यातील वरखेड येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेत (Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Prakalpa Yojana) रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्ट बांधकामाचे भूमीपूजन ठाकूर यांच्या हस्ते झाले. सुमारे ५४ लाख रुपये निधीतून हे काम पूर्णत्वास जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरण (Agricultural mechanization) योजनेत ट्रॅक्टरचे वितरणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

‘‘पोकरा योजना जिल्ह्यातील ५३२ गावांत राबवली जाते. या योजनेत वैयक्तिक लाभाच्या अनेक उत्तम योजना आहेत. ठिबक, तुषार संचाप्रमाणेच शेडनेट हाऊस, (Shednet House, like a snowflake,) पॉलिग्रीनहाऊससारख्या चांगले अनुदान असलेल्या योजनांचाही लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी या उपक्रमाची भरीव प्रसिद्धी गावोगावी करावी. प्रत्येक ठिकाणी शिबिरे घेऊन शेतकऱ्यांना (Farmer) वैयक्तिक योजनांचाही लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे’’, असे निर्देश ठाकूर यांनी दिले.

‘‘तिवसा तालुक्यात रिचार्ज शाफ्ट व ट्रेंच आदी अनेक जलसंधारणाची (Of water conservation) कामे नियोजित आहेत. ती लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न होत आहे’’, असे कांबळे यांनी सांगितले. या वेळी तहसीलदार वैभव फरतारे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अनिल खर्चान, माजी जि. प. सभापती पूजा आमले, शिल्पा हांडे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, सेतुभाऊ देशमुख, डॉ. अंजली ठाकरे, तालुका कृषी अधिकारी अनिल कांबळे, भूजल सर्वेक्षण वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Society Elections: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित; जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक संस्थांवर परिणाम

Poultry Farm Equipment: कुक्कुटपालनासाठी आवश्यक उपकरणे

Cyclone Arnab: ‘अर्णब’ चक्रीवादळानं आंध्र प्रदेशात हाहाकार, मुसळधार पाऊस, जोरदार वाऱ्यानं मोठी पडझड

Tractor Operated Implement: मूलस्थानी जलसंधारणासाठी ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे बनविणारे अवजार

El Nino Forecast: ‘एल निनो’चा अंदाज मिळू शकेल १२ महिने आधीच!

SCROLL FOR NEXT