Cotton Grading
Cotton Grading Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Grading : कापसाची प्रत कशी ठरविली जाते ?

Team Agrowon

सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. कापूस प्रतवारीच्या दृष्टीने कापसाची वेचणी (Cotton Pricking) व साठवणूक (Storage) करताना काळजी घेणे गरजेचे असते. यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यात पाऊस झाला व त्यामध्ये पहिल्या वेचणीचा कापूस भिजला व कापसाच्या प्रतवारीवऱ त्याचा परिणाम झाला. कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतीवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरिता वेचणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरू झाल्यापासून साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. आपल्याकडे वेचणी करताना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रुईमध्ये आढळतो. या बाबींचा धाग्याच्या गुणधर्मावर परिणाम तर होतोच त्याचबरोबर कापड गिरणीमध्ये प्रतवारी टिकविण्यास अडचण निर्माण होते. बऱ्याचदा ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजतो. त्यामुळे बरेच नुकसान होते. कापूस वेचणीच्या वेळी येणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन कापूस वेचणीचे नियोजन करावे. सर्वसाधारणपणे कापसाची वेचणी व विक्रीचा कालावधी जवळपास सारखाच असल्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापसाची आवक असते. त्यामुळे संकलन केंद्रावर प्रतवारी मोजमाप व प्रक्रिया करण्यास अडचणी निर्माण होतात. म्हणून सदृश्य पद्धतीनेच प्रतवारीचे काम मोठ्या प्रमाणावर करता येत होते. पण आता नवीन तंत्रज्ञानामुळे बऱ्याच संकलन केंद्रावर कापसाच्या गुणवैशिष्ट्यानुसार कापसाचा भाव ठरविला जातो. त्यामुळे चांगला प्रतवार असलेल्या मालाला योग्य भाव मिळतो. कापसाची प्रत कशी ठरविली जाते? याबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन विभागाने दिलेली माहिती पाहुया. 

कापसाची प्रत ठरवताना कोणत्या वाबी विचारात घेतल्या जातात? 

कापूस वाण निश्चित केल्यानंतर त्याची प्रतवारी आवश्यक आहे. प्रत ठरविताना कापसाचा रंग, स्वच्छता, रुईचे प्रमाण, स्पर्श, धाग्याची ताकद, लांबी, कापसातील पत्ती, काडीकचरा, अपरिपक्व व पिवळे टीक असलेल्या कापसाचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण विचारात घेतले जाते. 

१) कापसाचा रंग 

प्रत्येक वाणाच्या कपाशीला विशिष्ट प्रकारचा रंग असतो. उत्तम प्रतीच्या कपाशीला त्या वाणाचा मूळ रंग दिसून येतो. कापसाची प्रत हलकी असल्यास किंवा पावसाने भिजलेला कापूस असेल तर त्याचा परिणाम कपाशीच्या रंगावर होतो. त्यामुळे रुईमध्ये लाल, पिवळसर रंगाची रुई आढळल्यास अशा रुईला बाजारपेठेत कमी भाव मिळतो. 

२) कापसाची स्वच्छता 

कपाशीची वेचणी करताना झाडाची पत्ती, पालापाचोळा चिटकून येतो. काही वेळा नख्यासह कापसाचे बोंड वेचणी केली जाते. अशा प्रकारच्या विक्रीस आणलेल्या कपाशीमध्ये झाडाची पाने, पालापाचोळा, नख्या, माती इत्यादी अनावश्यक बाबी असल्यास कपाशीच्या प्रतीवर परिणाम होतो. 

३) तंतूची लांबी 

कापसाची गलाई झाल्यानंतर त्यापासून मिळालेल्या रुईतील थोडा भाग घेऊन हाताने त्यातील धागे ओढून किंवा प्रयोगशाळेत विशिष्ट उपकरणाद्वारे धाग्याची लांबी ठरविण्यात येते. परंतु विक्रीला मोठ्या प्रमाणात आलेल्या कापसाच्या तंतूची लांबी काढण्यासाठी प्रत्येक गाडीतील कापूस गलाई करून त्याची लांबी काढणे शक्य होत नसते. म्हणून विक्रीला आणलेल्या कापसातील काही कापूस एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने ओढून कापसातील रुई सरकी पासून वेगळी केली जाते. 

विशिष्ट पातळीवर धाग्याची समानता आल्यानंतर धाग्याच्या लांबीचा अंदाज घेण्यात येत होता. परंतु आता प्रयोग शाळेत नवीन आलेल्या उपकरणाद्वारे धाग्याची लांबी ठरवून अधिक लांब धाग्याच्या कापसाला अधिक भाव मिळतो. 

४) तंतूची ताकद 

विक्रीला आणलेल्या कापसापैकी काही कापूस हातात घेऊन दुसऱ्या हाताने त्यातील तंतू वेगळे करून व तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकद ठरविली जाते. चांगली, मध्यम व कमी अशा प्रकारे धाग्याच्या ताकदीचे प्रकार करून कापसातील परिपक्व व अपरिपक्व कापसाचे प्रमाण ठरवले जाते. तंतूच्या लांबीप्रमाणे तंतूच्या ताकदीवर भर देण्यात येतो. कापसाच्या तंतूची परिपक्वता विक्रीला आणलेला कापूस पूर्णतः परिपक्व, अर्धपरिपक्व किंवा अपरिपक्व आहे हे तपासणे आवश्यक असते. परिपक्वतेवर कापसातील रुईचे प्रमाण अवलंबून असते. रुईच्या प्रमाणाचा अंदाज कापूस हातात घेतल्यानंतर करता येतो. परिपक्व कापसाचे बोंड फुललेले असते व रुईचे प्रमाण अधिक असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT