Pomegranate Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Pomegranate Farming : २० वर्षांपासून डाळिंब उत्पादनात सातत्य

Pomegranate Fruit Crop : सोलापूर जिल्ह्यातील बलवडी (ता. सांगोला) येथे श्रीमंत शिंदे यांची ५० एकर शेती आहे. त्यात १२ एकरावर डाळिंब लागवड, तर उर्वरित क्षेत्रामध्ये ८ एकर पेरू, १० एकर सिमला मिरची आणि मागील ६ महिन्यांपूर्वी ३ एकरांवर जांभूळ लागवड केली आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये हंगामी पिकांची लागवड केली जाते.

Team Agrowon

शेतकरी नियोजन पीक ः डाळिंब

शेतकरी ः श्रीमंत सर्जेराव शिंदे

गाव ः बलवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर

एकूण शेती ः ५० एकर

डाळिंब क्षेत्र ः १२ एकर

Pomegranate Management : सोलापूर जिल्ह्यातील बलवडी (ता. सांगोला) येथे श्रीमंत शिंदे यांची ५० एकर शेती आहे. त्यात १२ एकरावर डाळिंब लागवड, तर उर्वरित क्षेत्रामध्ये ८ एकर पेरू, १० एकर सिमला मिरची आणि मागील ६ महिन्यांपूर्वी ३ एकरांवर जांभूळ लागवड केली आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये हंगामी पिकांची लागवड केली जाते.

शिंदे मागील २० वर्षांपासून डाळिंब उत्पादन घेत आहेत. उन्हाळ्यात त्यांच्या भागात सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जूनमध्ये सिमला मिरचीसह अन्य भाजीपाला पिकांवर लक्ष केंद्रित केले जाते. सुरुवातीच्या दोन-तीन महिन्यांत यामध्ये कामाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे डाळिंब बागेत लक्ष देणे शक्य होत नाही.

डाळिंब बागेत प्रामुख्याने हस्त बहर धरला जातो. दरवर्षी एकरी सरासरी ७ ते ८ टन उत्पादन मिळते. गेल्या वर्षी प्रतिकिलो डाळिंबास सरासरी ८० रुपये, तर सर्वाधिक १०० रुपयांपर्यंत दर मिळाला. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण डाळिंब फळांची निर्यातही केली जाते.

मागील कामकाज

 दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्यात हस्त बहर धरण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार सर्व कामांचे नियोजन केले जाते.

 जून महिन्यात बागेची छाटणी करून घेतली. छाटणी केलेल्या फांद्याची योग्य विल्हेवाट लावली.

 छाटणी झाल्यानंतर बोर्डो मिश्रणाच्या १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घेतल्या.

 ताण कालावधीत बागेला जून महिन्यात प्रति झाड चांगले कुजलेले शेणखत ५० किलो प्रमाणे दिले. त्यानंतर रासायनिक खतांचे बेसल डोस देण्यात आले. त्यात १२ः३२ः१६ हे खत २०० किलो, गंधक ५० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये ५० किलो आणि निंबोळी पेंड ४०० किलो प्रति एकर प्रमाणे दिले.

 छाटणीनंतर बागेत तेल्या रोग आणि पिनहोल बोररचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या दर १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारण्या घेतल्या.

 बागेतील मुख्य खोड आणि काडीवरील वॅाटरशूट काढून घेतले.

आगामी कामकाज

 सध्या बाग ताणावर असून, सप्टेंबर महिन्यात बहर धरण्याचे नियोजन आहे. मात्र पावसामुळे बागेला अपेक्षित ताण बसत नाही. ताण चांगला बसण्यासाठी १५ ऑगस्ट आणि २५ ऑगस्टच्या दरम्यान दोन वेळा इथ्रेलची फवारणी घेतली जाईल.

 दर ८ दिवसांतून एकदा ०ः०ः५० आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली जाईल

 काडी फुगवणीसाठी ०ः०ः५० हे १५ ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे दर आठ दिवसांतून एक फवारणी घेतली जाईल.

 तेल्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोर्डो मिश्रण आणि शिफारशीत घटकांची फवारणी आणि अन्य कार्यवाही केली जाईल.

 तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर टाळला जातो. मजुरांच्या मदतीने तणनियंत्रण केले जाईल.

 जमिनीतील वाफसा आणि पाऊस यांचा अंदाज घेऊन ठिबकद्वारे सिंचन केले जाईल.

- श्रीमंत शिंदे, ९९७५९२५२१६

(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IMD Rain Predication : चिंता वाढणार: राज्यात ऑगस्टमध्ये कमी पाऊस; मराठवाडा, विदर्भात खंड पडणार ?

Agrowon Podcast : सोयाबीनचे दर टिकून; आजचे ज्वारी बाजार, ज्वारी दर, बेदाणा भाव, ढोबळी मिरची रेट

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानातील ९५ कामांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित

Automation In Farming: खते, पाणी बचतीसाठी ऑटोमेशनवर भर 

Nagpur Heavy Rain: नागपुरात अतिवृष्टीमुळे ७,४३० हेक्टरवर नुकसान

SCROLL FOR NEXT