Kharif Vegetables  Agrowon
ॲग्रो गाईड

Kharif Vegetables : खरीपात भाजीपाल्याच्या या जातींची निवड करा

Vegetable Crop : खरीप हंगामात सर्व पालेभाज्या, वाटाणा, श्रावण घेवडा, वाल, चवळी, तांबडा भोपळा, दोडका, पडवळ, कारली, गवार, घोसाळी, वांगी, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, मुळा, गाजर, बटाट्यासारखी भाजीपाला पिके घेतली जातात.

Team Agrowon

Kharif Season : अनेक प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन (Vegetable Production) वर्षभर घेता येते. अल्पभूधारक शेतकरी अल्प भांडवलामध्ये कमी अवधीत अधिक उत्पादन भाजीपाला लागवडीतून मिळवू शकतात.

सर्वसाधारणपने अनियमित पाऊसमान असल्याने उपलब्ध पाणीसाठा कमी होत आहे. त्याचप्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पीक संरक्षणासाठीच्या खर्चात वाढ होत आहे.

अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पोषक वातावरणामध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरु शकते. 

खरीप हंगामात सर्व पालेभाज्या, वाटाणा, श्रावण घेवडा, वाल, चवळी, तांबडा भोपळा, दोडका, पडवळ, कारली, गवार, घोसाळी, वांगी, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, मुळा, गाजर, बटाट्यासारखी भाजीपाला पिके घेतली जातात.

गणपती झाल्यानंतर पितृ पंधरवाड्यामध्ये विविध प्रकारची भाजी यावी यासाठी लागवडीत पैसे मिळवता येतात. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात थंडी सुरु होण्यापुर्वी भेंडी उगवून एन थंडीत भेंडीचे हमखास पैसे होतात.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये तांबडा भोपळा, तोंडली, कारले, दुधी भोपळा ही महत्वाची पिके आहेत. महाराष्ट्रात करटोली हे पीक फक्त पावसाळी हंगामात आढळून येते.

श्रावण घेवड्याची लागवड सर्वसाधारण पावसाळ्यात करतात. चांगला पाऊस पडल्यानंतर जुलैपर्यंत पेरणी करुन श्रावण घेवडा ९० ते ११० दिवसात काढणीस तयार होतो. 

महाराष्ट्रात लागवडीच्या दृष्टीने टोमॅटोचे वाण पुसा रुबी जे तीनही हंगामात घेता येते. लागवडीनंतर ४० ते ९० दिवसांनी फळे काढणीस येतात. पुसा गौरव या जातीची फळे लांबट गोल पिकल्यावर पिवळसर लाल रंगाची होतात.

आणि वाहतूकीस योग्य आहेत. अर्का गौरव, रोमा, भाग्यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली व्डार्फ इ. जातींच्या टोमॅटोच्या वाणाची महाराष्ट्रात लागवड केली जाते. मांजरी गोटा, वैशाली, अरुणा, प्रगती या वांग्याच्या प्रमुख जाती आहेत तर  पुसा ज्वाला, पंत सी - १, अग्गिरेखा, परभणी टॉल, फुले ज्याती, कोकणक्रांती, फुले मुक्ता, फुले सुर्यमुखी, एनपी ४६ या सारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या मिरचीच्या जाती लागवडीयोग्य आहेत. पुसा सावनी, फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका या भेंडीच्या प्रमुख सुधारीत जाती लागवडीस योग्य आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Market : पुसद बाजार समितीत चोवीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Agriculture Irrigation : ‘धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तने सोडा’

Agriculture Department : दोन महिन्यांत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करा

Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली ४ हजार २६२ शेततळी

Tree Cutting Tender : हजारो झाडांचा अवघ्या दीड लाखाला सौदा

SCROLL FOR NEXT