बाजारातील मागणीनुसार आले पिकाची काढणी करावी.
बाजारातील मागणीनुसार आले पिकाची काढणी करावी. 
ॲग्रो गाईड

योग्य परिपक्वतेला करा पिकांची काढणी

गजानन तुपकर

पिकांची योग्य परिपक्वतेला काढणी करण्यासाठी पिकांच्या परिपक्वतेचे मापदंड माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व पिकांचा जीवनक्रम हा ठरलेले असतो, त्यात जमिनीचा प्रकार, लागवडीसाठी वापरलेली जात, लागवडीचा हंगाम इ. मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. त्यानुसार आपण काढणीचा योग्य कालावधी ठरवू शकतो. आले

  • पीक ७५ टक्के परिपक्व झाल्यानंतर काढणी करावी.
  • हिरवे आले म्हणून वापरावयाचे असल्यास पिकाची काढणी सहा महिन्यांनी करावी.
  • विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागवडीनंतर आठ महिन्यांनंतर पुढे काढणी करावी.
  • शक्यतो बाजारातील मागणीनुसार काढणी करावी.
  • गड्डे बाहेर काढतांना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पाला कापून गड्डे, बोटे (नवीन आले) काढणीनंतर वेगळे करावे.
  • काढणीनंतर कंद स्वच्छ धुवून मातीपासून वेगळे करावेत. त्यानंतर बाजारात पाठवावेत.
  • हळद

  • काळ्या कसदार जमिनीत पिकास ८ ते ९ महिने पूर्ण झाले कि ६० ते ७० टक्के पाने वाळतात.
  • माळरान व हलक्या जमिनीमध्ये ८० ते ९० टक्के पाने कालावधी पूर्ण होतेवेळी वाळतात.
  • हळद काढणीपूर्वी पाला जमिनीलगत धारदार खुरप्याने कापून ४ ते ५ दिवस शेतातच वाळू द्यावा.
  • पाला गोळा करून घ्यावा. त्याचा उपयोग हळद शिजवण्यासाठी इंधन म्हणून होतो किवा कंपोस्ट कल्चर वापरून उत्तम सेंद्रिय खत तयार करता येते.
  • पाला कापणीनंतर ८ ते १० दिवसांनंतर थोडी जमीन भेगाळल्यानंतर कुदळीच्या सहाय्याने काढणी करावी.
  • काढणी करताना वरम्ब्यातील गड्ड्याच्या ३ ते ५ सेंमी समोर कुदळ एकाच ठिकाणी एक ते दोन वेळा जोराने मारून जोराने दंड उलट दिशेने दाबल्यास गड्डा सर्व हळकुंडासह बाहेर निघतो.
  • काढणी करण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा संशोधित हळद काढणी यंत्राचा वापर करावा.
  • निघालेला गड्डा सरीच्या वरंब्यावर उलटा तीन दिवस उन्हामध्ये वाळवावा. त्यामुळे गड्ड्यास चिकटलेली माती मोकळी होते.
  • असा गड्डा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकांपासून वेगवेगळे होतात. नंतर जेथे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे स्वतंत्र करावी.
  • ओल्या कंदाचे हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल प्रती हेक्टरी मिळते.
  • लसूण

  • पीक साधारणपणे १३० ते १५० दिवसात काढणीला येते. गड्ड्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानांची वाढ थांबते. पाने पिवळी पडतात. शेंडे वाळतात. मानेत लहानशी गाठ तयार होते. त्यास लसणी फुटणे असे म्हणतात.
  • पाने पूर्ण वाळन्यापूर्वी काढणी करावी. जेणे करून पानांची वेणी बांधने सोपे जाते.
  • लसूण लहान कुदळीने अथवा खुरप्याने खोदुन काढावा.
  • काढलेला लसूण दोन दिवस तसाच शेतात ठेवावा. ठेवताना गड्ड्याचा भाग पानांनी झाकला जाईल याची काळजी घ्यावी.
  • दोन दिवसानंतर २०-३० सारख्या आकाराच्या गड्ड्यांची वेणी बांधावी.
  • अशा गड्ड्या झाडाखाली किवा हवेशीर छपरात १० ते १५ दिवस सुकवाव्यात.
  • लहान गड्डे व फुटलेल्या गड्ड्यांची प्रतवारी करावी. गड्ड्या साठवणगृहात ठेवाव्यात.
  • बाजारात विक्रीसाठी पाठवितांना वाळलेली पात कापून गड्ड्या प्रतवारी करून बारदाण्याच्या गोणीत भरून विक्रीसाठी पाठवाव्यात.
  • बटाटा

  • काढणीपूर्वी ८ ते १० दिवस पाणी देऊ नये. जमीन पूर्णपणे सुकू द्यावी.
  • काढणी, कुदळ, नांगर, किवा पोटॅटो डिगरने करावी.
  • काढणी करताना बटाट्यास इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • बटाट्यावरील माती काढून स्वच्छ करावी. काढणीनंतर बटाटे शेतात पडू न देता गोळा करून सावलीत आणावे. बटाट्याचे लहान-लहान ढीग करून आठवडाभर तसेच ठेवावेत.
  • सुकविल्यानंतर बटाट्याची प्रतवारी करावी. खराब, फुटके आणि नासलेले बाटाटे काढून टाकावेत.
  • आकारमानानुसार प्रतवारी करून ते जाळीदार पोत्यात भरून बाजारात विक्रीसाठी किवा शीतगृहात साठवणीसाठी पाठवावेत.
  • कलिंगड

  • फळांची तोडणी रोप लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी करावी.
  • फळ हाताने दाबले असता कर्रकर्र असा आवाज येतो. फळाचा जमिनीलगतचा भाग पांढरट, पिवळसर होतो.
  • फळे काढल्यानंतर सावलीत एका ठिकाणी गोळा करावीत. रोगट, किडलेली, फुटलेली फळे बाजूला काढावीत.
  • फळांच्या आकारावरून लहान-मोठी फळे या स्वरुपात प्रतवारी करावी.
  • संपर्क ः गजानन तुपकर, ८२७५४१२०६४ (विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT