ओळखा हरभऱ्यावरील रोगाचा प्रादुर्भाव
ओळखा हरभऱ्यावरील रोगाचा प्रादुर्भाव 
ॲग्रो गाईड

ओळखा हरभऱ्यावरील रोगाचा प्रादुर्भाव

डॉ. धनश्री सरनोबत, लीना शितोळे

हरभरा वाढीच्या टप्प्यामध्ये मर, मानकुजव्या आणि बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. या रोगाची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. मर रोग ः रोगकारक बुरशी ः फ्युजेरिअम ऑक्‍सिस्पोरम फॉर्मा लक्षणे ः

  • कोवळी रोपे कोमेजतात. जमिनीलगत खोडावरील पेशी रंगहीन होत जातात.
  • खोडाच्या मध्यपेशी तपकिरी किंवा काळ्या पडलेल्या दिसतात.
  • पानांचे देठ व फुलांचे गुच्छ मरगळून मोठी झाडे कोमेजतात.
  • नियंत्रण ः

  • लागवडीसाठी विशाल, दिग्विजय या रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
  • प्रादुर्भाव असलेल्या शेतात तीन वर्षापर्यंत हरभऱ्याची लागवड करू नये.
  • मान कुजव्या ः रोगकारक बुरशी ः स्क्‍लेरोशियम रोल्फसी लक्षणे ः

  • रोपे पिवळी पडून मरतात, वाळतात.
  • जमिनीलगतचा भाग बारीक होऊन कुजू लागतो. प्रादुर्भाव झालेल्या भागावर पांढरे पट्टे येतात.
  • कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया
  • कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी
  •   ओली काळी मूळ कूज ः रोगकारक बुरशी ः फ्युजॅरियम सोलॅनी लक्षणे ः

  • अति ओलावा असलेल्या जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
  • मुळांना जोडलेल्या खोडाच्या वरील भागावर तपकिरी रंगाचे डाग दिसतात.
  • मुळे काळी पडून सडतात.
  • विशाल, विराट या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.
  • पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी.
  • खुजा रोग ः विषाणू-मुळे या रोगाचा प्रसार होतो. लक्षणे ः

  • झाडांची वाढ खुंटते, पाने छोटी होऊन पिवळी तपकिरी होतात.
  • सुदृढ झाडाच्या पानापेक्षा प्रादुर्भावीत पाने कडक असतात.
  • खोडातील तंतुपेशी तपकिरी पडतात.
  • पीकेव्ही-१, पीकेव्ही-४  रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.
  • रोगाचा प्रसार मावा किडीमार्फत होतो. नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड ०.०८ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • बुरशीजन्य करपा ः

    रोगकारक बुरशी ः अस्कोकायटा रेबी अति आर्द्रता व कमी तापमान या रोगास पोषक आहे. सर्वसाधारणपणे फुलोरा व घाटे धरणाऱ्या वेळी या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. लक्षणे ः

  • खोडाच्या खालच्या बाजूस गडद तपकिरी ठिपके दिसू लागतात.
  • रोपे कोलमडून पडतात. पानावरील ठिपके गोलाकार, कडा तपकिरी व केंद्रक करड्या रंगाचे असतात.
  • विजय या रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी.
  • थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया करावी.
  • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • संपर्क ः डॉ. धनश्री सरनोबत, ८२७५४७३२०२ (वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

    Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

    Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

    Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

    Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

    SCROLL FOR NEXT