खपली गहू वाण  ः एमएसीएस २९७१
खपली गहू वाण ः एमएसीएस २९७१ 
ॲग्रो गाईड

तंत्र खपली गहू लागवडीचे...

डॉ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत

खपली गव्हाची पेरणी १ ते २० नोव्हेंबर दरम्यान साधारण थंडी वाढल्यास म्हणजे १५-२० सेल्सिअस तापमान झाल्यानंतर करावी. बागायती पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर २२.५ से. मी. ठेवून पेरणी करावी. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. पेरणी करताना ५-६ से.मी. पेक्षा जास्त खोल बियाणे पडणार नाही, याची काळजी घ्यावी. गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटकमधील नदी खोऱ्यातील गाळाच्या व भारी जमिनीत प्रामुख्याने कोरडवाहू भागात खपली गहू उत्पादन घेतले जाते. कमी उत्पादनामुळे खपली गहू पिकाची गेल्या काही दशकामध्ये लागवड कमी होत गेली. मात्र, सुधारित जाती, योग्य तंत्राचा वापर केल्यास या पोषक गव्हापासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. भारतामध्ये ब्रेड/चपाती किंवा शरबती (triticum aestivum), बन्सी गहू (T. durum), व खपली गहू (t. dicoccum) या तीन प्रकारच्या गव्हाची लागवड होते. त्यातील ९५ टक्के वाटा हा शरबती गव्हाचा असला तरी पोषकतेमुळे खपली गव्हाची मागणी वाढत आहे.

खपली गव्हातील पोषकता व उपयुक्तता

  • पाचक पदार्थ (१६ टक्के fibers), प्रथिने (१२ ते १५ टक्के) व कर्बोदके (७८ ते ८३ टक्के) व ग्लोसेमिक इंडेक्‍स कमी असतो. हा इंडेक्स अधिक असलेले पदार्थ मधुमेही रुग्णांसाठी अपायकारक मानले जातात.
  • खपली गव्हाद्वारे उत्कृष्ट प्रतीचा रवा, शेवया, पास्ता बनविता येऊ शकतो. खपली गव्हाचे पदार्थ चविष्ट, मऊ व मनाला संतुष्टी देणारे असतात.
  • महाराष्ट्रामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात फलटण (जि. सातारा) परिसरात खपली गव्हाचा पेरा वाढत आहे. राज्यातील अनुकूल वातावरणामुळे अन्य ठिकाणीही खपली गहू लागवडीला प्रोत्साहन   देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कर्नाटकातील धारवाड येथील संशोधनातून पुढे आलेल्या तंत्राचा वापर करण्याची आवश्यकता आहे.
  • पेरणीची वेळ : गव्हाची पेरणी १ ते २० नोव्हेंबर दरम्यान करावी. थंडी वाढल्यास म्हणजे १५-२० सेल्सिअस तापमान झाल्यानंतर पेरणी करावी. बीज प्रक्रिया : (प्रति किलो बियाणे) थायरम ३ ग्रॅम/किलो. त्यानंतर अॅझेटोबॅक्‍टर व स्फुरद विरघळवणारे जीवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो. बियाण्याचे प्रमाण : बागायती पेरणीसाठी १०० किलो प्रति हेक्‍टर बियाणे वापरावे. पेरणीचे अंतर : बागायती पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर २२.५ से. मी. ठेवून पेरणी करावी. पेरणी करताना ५-६ से.मी. पेक्षा जास्त खोल बियाणे पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

    खतांचा वापर : जमीन तयार करताना २५ गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. पेरणी करताना नत्र, स्फुरद, पालाश प्रत्येकी ५० किलो खत मात्रा द्यावी. उर्वरीत अर्धी नत्र मात्रा म्हणजे ५० नत्र/हेक्‍टर पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी.

    आंतरमशागत :

  • खपली गहू पीक पेरणीपासून ३० ते ४५ दिवस तणविरहीत ठेवावे. अन्यथा ३० ते ३५ टक्के उत्पन्नात घट येते. त्यासाठी १ ते २ खुरपण्या ४५ दिवसांपर्यंत कराव्यात.
  • उगवणीपूर्वी ऑक्‍झीफ्लोरफेन ०.२५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणे जमिनीवर फवारणी करावी. त्यानंतर ६ आठवड्यांनी एखादी खुरपणी करावी.
  • खपली गव्हाचे वाण  

     खपली वाण  कालावधी (दिवस) उत्पन्न (क्विं/हे.)      वैशिष्ट्ये
    एनपी-२००  १०५ - ११०                -  तांबेरा रोग प्रतिकारक
     डी.डी.के-१००१ १०५ - ११० ५७ निमबुटका वाण
    डी.डी.के-१००९ १०५ - ११० ४७-६७  निमबुटका वाण, तांबेरा प्रतिबंधक
     डी.डी.के-१०२५  १०५ - ११० ४२-४९ निमबुटका वाण, प्रथिनांचे प्रमाण १३ टक्के
     डी.डी.के-१०२९  १०५ - ११०  ४५-५९  निमबुटका वाण, प्रथिनांचे प्रमाण १३ टक्के
     एमएसीएस-२९७१  ११० - ११५  ४६-६२ तांबेरा प्रतिकारक
     एच.डब्यू-१०९८   १०५ - ११० ४५-६२ तांबेरा प्रतिकारक, प्रथिने १३.५ टक्के

    पाणी व्यवस्थापन जमिनीच्या मगदुराप्रमाणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने खपली गहू पिकाच्या विविध अवस्थेत पाणी द्यावे. खपली गहू पीक वाढीच्या संवेदनशील अवस्था

    पीकवाढीची संवेदनशील अवस्था     पेरणीनंतर दिवस
    मुकूटामुळे फुटण्याची अवस्था १८ - २१
    फुटवे जास्तीत जास्त येण्याची अवस्था ३० - ३५
    कांडी धरण्याची अवस्था   ४५ - ५०
    पीक फुलात असतानाचा काळ  ६५ - ७०
    दाण्यात दुधाळ चीक अवस्था    ८० - ८५
    दाणे भरताना अवस्था ९० - ९५

    वरील अवस्थेपैकी मुकूटमुळे अवस्था, फुटवे, फुटव्याची अवस्था, फुलोरा आणि दुधाळ अवस्था या अत्यंत महत्त्वाच्या असून, या काळात पाण्याच्या पाळ्या अवश्‍य द्याव्यात. सिंचनाची उपलब्धता कमी असल्यास पाणी पाळ्याचे नियोजन खालील प्रमाणे करावे.

    ओलिताची उपलब्धता   पाण्याची पाळी देण्याची वेळ (पेरणीपासून दिवसांनी)
    एक ओलिताची सोय ४२
    दोन ओलिताची सोय  २१, ६४
    तीन पाण्याच्या पाळ्याची सोय असल्यास २१, ४२, ६५
    चार पाणी पाळी शक्य असल्यास ६५, ९५

    संपर्क : ०२४५२- २२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

    Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

    Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

    Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

    SCROLL FOR NEXT