ॲग्रो गाईड

सुपारी लागवडीसाठी कोणती जात निवडावी?

सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन, जि. रायगड

सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी. या जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त आहे. ही सुपारी मऊ आहे. या सुपारीचा आकार आकर्षक असल्याने दरही चांगला मिळतो. योग्य वाढ झालेल्या झाडापासून सोललेल्या सुपारीचे दोन किलो उत्पादन मिळते. लागवड करताना जमिनीवरील झुडपे तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी सुरूची रोपे बागेभोवती लावावीत. लागवड करण्यासाठी २.७ x २.७ मीटर अंतरावर ६० सें.मी. x ६० सें.मी. x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. त्यामध्ये पालापाचोळा, दोन पाटी चांगले कुजलेले शेणखत, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट चांगल्या मातीमध्ये मिसळून खड्डा भरून घ्यावा. लागवडीसाठी रोपांची निवड करताना जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पाने असलेली जोमदार, १२ ते १८ महिने वयाची रोपे निवडावीत. रोपांना कमीत कमी चार ते पाच पाने असावीत. उंच व लांब पानांची रोपे लागवडीसाठी निवडू नयेत.

    लागवड जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करावी. रोपांची चांगली वाढ होईपर्यंत रोपांचे पावसापासून संरक्षण करावे.

संपर्क : ०२१४७ - २२३३७४ सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन, जि. रायगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT